जळगाव प्रतिनिधी - एरंडोल तालुक्यातील एका वसतिगृहातील ५ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला असून गेल्या दहा महिन्यापासून हा प्रकार सुरु होता.
या संदर्भात अधिक असे की, ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ या दरम्यान एरंडोल तालुक्यातील वसतीगृहातील पाच मुलींवर तेथील वसतीगृहाची देखरेख करणारा गणेश शिवाजी पंडीत याने पाचही अल्पवयीन मुलींचे गेल्या दहा महिन्यापासून वेळोवेळी लैंगिक छळवणूक करून अनसर्गिक संभोग केल्याचा प्रकार घडला आहे .
या प्रकरणी पीएसआय शरद बागल यांच्या फिर्यादीवरून गणेश शिवाजी पंडीत, सचिव भिवाजी दीपचंद पाटील यांच्यासह अधीक्षक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, पिडीत मुली बालगृहात असताना सदर मुलींसोबत संस्थेतील देखरेख करणारा गणेश पंडित याने लैंगिक अत्याचार केल्याबाबत लेखी स्वरूपात तसेच व्हिडिओ शूटिंगमधील माहिती बालकल्याण समिती जळगाव यांना पिडीत बालकांसोबत प्रत्यक्ष केलेल्या चर्चेतून समजली होती. याप्रकरणी दोन संशयित आरोपी अटकेत आली आहे
0 टिप्पण्या