रेखा जरे हत्याकांड : आरोपींना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याची मागणी

 पुढची सुनावणी पाच ऑगस्टला



नगर : राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडप्रकरणी सर्व आरोपींना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली. मात्र मुख्य आरोपी बाळ बोठे साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, असा युक्तिवाद करत सरकारी पक्षाच्यावतीने आरोपींना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्यास विरोध करण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी होणार आहे.

रेखा जरे हत्याकांडाची सुनावणी नगर येथील जिल्हा न्यायालयात सुरू झाली आहे. गेले तीन वेळा आरोपींकडून वकील देण्यास उशीर होत असल्याने सुनावणी पुढे ढकलावी लागली. शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी सुरू झाल्यानंतर आरोपींचे वकील महेश तवले आणि सुनील मगरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलण्यास मर्यादा येतात असे सांगून प्रत्यक्ष प्रश्न विचारण्यासाठी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करावे, अशी मागणी केली. 

विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी मात्र त्यास विरोध केला. कुठल्याही आरोपीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांना प्रत्यक्ष न्यायालयात आणण्याची गरज नाही. आरोपी साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, असे यादव म्हणाले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या