तोतया पोलीस अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात


नगर - तोतया पोलीस अधिकारी बनवून लोकांची फसवणुक  करणाऱ्याला पोलिसांनी  जेरबंद केले असून 

 सतिष काशिनाथ झोजे असे  अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे . पोलीस अधिकारी असल्याचे सांगत त्याने  लोकांची फसवणुक  केली आहे. 

गुप्त  बामतीदारा  मार्फत पोलिसांना माहिती मिळाली कि, झोजे  हा  सिटी लॉन्स , पाईपलाईन रोड अहमदनगर येथे उभा असून गाडी मध्ये डॅश बोर्डवर पोलीस ऑफीसर कॅप ठेवलेली आहे. अशी माहिती मिळताच  पोलिसांनी त्या ठिकाणी दाखल होत. 

 त्याचे नाव गाव विचारता त्याने सुरूवातीस त्याचे नाव पोलीस उप- निरीक्षक सतिष काशिनाथ झोजे नेमणुक पोलीस मुख्यालय अहमदनगर असे असल्याचे सांगितले. पथकाने त्यास त्याचे ओळखपत्र दाखविणेबाबत विचारणा  केली असता  त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. 

त्यावेळी पोलीस पथकाने त्याचे नावाचा कोणी पोलीस अधिकारी पोलीस मुख्यालय येथे नेमणुकीस आहे का याबाबत माहिती घेतली असता सदर नावाचा कोणीही पोलीस अधिकारी नेमणुकीस नसल्याची माहिती मिळाल्याने त्याचेकडे अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सतिष काशिनाथ झोजे  रा. ढवणवस्ती, तपोवनरोड अहमदनगर मूळ रा. मालुंजा ता. गंगापूर जि छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. सदर इसमाची व त्याचे ताब्यातील गाडीची पंचासमक्ष झडती घेता त्याचे कब्जामध्ये सतिष काशिनाथ झोजे परि. पोलीस उप-निरीक्षक या नावाची नेम प्लेट लावलेला, टोपी त्यावर राजमुद्रा असलेला मोनोग्राम, बेल्ट, बूट, लाईन यार्ड, असा पोलीस उप निरीक्षकाचा संपूर्ण गणवेश व स्वीफ्ट डिझायर कार ताब्यात घेतली  असून त्याच्या विरोधात  तोफखाना  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस   करीत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या