उंबरे गावात दोन गटात धुमश्चक्री! तीन जण गंभीर जखमी !

 राहुरी शहर प्रतिनिधी,-


राहुरी तालूक्यातील उंबरे येथे नाजूक कारणावरुन एका गटाने दुसर्‍या गटावर हल्ला करत तोडफोड, दगडफेक करत मारहाण केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे उंबरे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होऊन अनेक तरुणांना ताब्यात  घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे 

 राहुरी तालुक्यातील उंबरे  येथे  काल   एका नाजूक कारणावरुन दुपार वाजेपासून  दोन गटात हमरी तूमरी चालू होती. रात्री नऊ वाजे दरम्यान त्या ठिकाणी १०० ते १५० जणांच्या एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केला. या हल्ल्यात मस्जिद व काही दुकानांवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. तसेच काही तरूणांना बेदम मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिस पथकाने रात्रभर कोंबीग ऑपरेशन करून दंगल करणाऱ्या दहा तरूणांची धरपकड करत ताब्यात घेतले आहे सध्या उंबरे परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा असल्याने उंबरे गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर उंबरे गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. उंबरे येथे झालेल्या मारहाणीत तीन तरूण गंभीर जखमी झाले असून त्यांना अहमदनगर व पुणे येथील रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. 

   सलीम वजीर पठाण, रा. उंबरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेंद्र रायभान मोहिते, वय २५ वर्षे, रा. गणेशवाडी सोनई, ता. नेवासा, गणेश अशोक सोनवने, वय २१ वर्षे, रा. श्रीरामवाडी, सोनई, ता. नेवासा, शेखर बाळासाहेब दरंदले, वय ३० वर्षे, रा. त्रिमुखे थिएटर सोनई, ता. नेवासा, सचिन विजय बुऱ्हाडे, वय २५ वर्षे, रा. शिवाजी चौक, राहुरी, नवनाथ भागीनाथ दंडवते, वय ३६ वर्षे, रा. ब्राम्हणी ता. राहुरी, संदिप भाऊसाहेब लांडे, वय ३२ वर्षे, रा. लांडेवाडी सोनई, ता. नेवासा, शुभम संजय देवरे, वय २५ वर्षे रा. स्टेशन रोड, राहुरी, सुनिल उत्तम दाभाडे, वय २६ वर्षे, रा. क्रांतीचौक कातोरे गल्ली, राहुरी, मारुती बाळासाहेब पवार, वय २२ वर्षे, रा. निंभारी, ता. नेवासा, प्रतिक प्रकाश धनवटे, वय २९ वर्षे, रा. तनपुरे गल्ली, राहुरी. या दहा जणांना अटक केली असून १५ जण पसार झाले आहेत. पोलिस पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. 

          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या