समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; श्रीरामपूरचे दोघे ठार

 

 आरोग्य सेवक श्रीकांत थोरात यांच्यासह चालक हर्षल भोसले मृत्युमुखी

श्रीरामपूर : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर बुधवारी (दि.19) मध्यरात्री एकच्या सुमारास स्विफ्ट कारचा भीषण अपघात होऊन दोन जण ठार झाले. सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात हा अपघात झाला. आरोग्य सेवक श्रीकांत थोरात आणि चालक हर्षल भोसले अशी मृतांची नावे आहेत. समाजसेवी तरुण आरोग्य सेवक अपघातात मृत्युमुखी पडल्याने श्रीरामपूर शहर नगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केले जात आहे. महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर हद्दीतील समृध्दी महामार्गावर किमी ५६१.५ नागपुर लेनवर नाशिक बाजू कडून शिर्डी बाजूकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार क्र.MH-14 EY-7198 हिचेवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दोन्ही रस्त्यांच्या मध्ये असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळल्याने अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.


या भीषण अपघातात चालक हर्षल भोसले व श्रीकांत दत्तात्रय थोरात (श्रीरामपूर) हे दोघे जागीच मयत झाले असून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, सिन्नर येथे पाठविण्यात आले आहेत. अपघातग्रस्त वाहन मुख्य रस्त्यावरून बाजूला असल्याने वाहतुकीत कुठलाही कोळंबा आला नाही. वावी पोलीस अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या