Crime : जामखेडमध्ये गुंडाचा पोलिसांवर गोळीबार..!

 जामखेड - 


तिघा तरूणांनी जामखेड पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली  आहे. यावेळी पोलिसांची अन् आरोपींची झटापट झाल्याने दोन पोलिस जखमी झाले आहेत. या घटनेत स्वरक्षणासाठी जामखेड पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक  आरोपी  जखमी झाला आहे. ही सिनेस्टाईल थरारक घटना मंगळवारी मध्यरात्री जामखेड शहरात घडली. या प्रकरणात जामखेड पोलिस स्टेशनला तिघा जणांविरूध्द दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आहे.

जामखेड शहरातील एका तरुणाच्या डोक्याला बंदूक लावत त्याच्याकडील  ईरटीका गाडी  घेऊन आरोप फरार झाले होते .   पेट्रोलिंगवर असलेल्या जामखेड पोलिसांच्या पथकाने  या टोळीला अडवण्याचा प्रयत्न केला असता या टोळीने गावठी कट्ट्यातून जामखेड पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी पोलिसांच्या बचावासाठी आरोपीच्या दिशेने गोळीबार केला या गोळीबारामध्ये एका आरोपीच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत.याप्रकरणी जामखेड प्रताप उर्फ बाळू हनुमंत पवार, शुभम बाळासाहेब पवार, काकासाहेब उत्तम डुचे,  यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.याआधीही या आरोपीवर जबरी  चोरी , दरोडा, हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या