राहुरी शहर प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील गुहा येथील धार्मिक स्थळावर पारायण घेण्याच्या कार्यक्रमाच्या मुद्द्यावरून दोन समाजात पुन्हा तणाव निर्माण झाल्याची घटना घडली आहे यामुळे गुहा गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
गुहा गावात एका धार्मिक स्थळाच्या मुद्द्यावरून गेल्या काही वर्षांपासून दोन समाजात वाद-विवाद सुरू आहेत. याच धार्मिक स्थळावर हिंदू धर्मींयांनी आधिक मासानिमित्त कालपासून पारायण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माञ या कार्यक्रमावर मुस्लिम धर्मियांनी आक्षेप घेतल्यामुळे आज पुन्हा वाद पेटला. हिंदू बांधव ग्रंथ व पूजेचे साहित्य घेऊन धार्मिक स्थळाकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवले. आम्हाला पारायण करू द्या अशी मागणी हिंदू बांधवानी प्रशासनाकडे मागणी केली.
त्यावर
पोलीस उपअधीक्षक डॉ.बसवराज शिवपुंजे , तहसीलदार चंद्रजित राजपूत, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आपापसात चर्चा करून प्रातिनिधिक स्वरूपात ९ हिंदु भक्तांना प्रवेश देऊन पारायण सुरू करण्याचे सांगितले. त्यानुसार हे पारायण सुरू झाल्यानंतर वाद निवळला
गुहा येथील धार्मिक स्थळ परिसरात डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपुंजे, तहसीलदार राजपूत व पोलीस निरीक्षक जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून ९ दिवस हा पारायण सोहळा सुरू राहणार असून या ठिकाणी कुठलाही वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.
0 टिप्पण्या