श्रावणापूर्वी बाजारात घोरपडींची विक्री

 

राष्ट्र सह्याद्री स्पेशल रिपोर्टराहुरी : आज मंगळवारपासून अधिक-श्रावण मासरंभ झाला. तब्बल दोन महिने श्रावण महिना व त्यानंतर गणपती, नवरात्र उत्सवामुळे नॉनव्हेज खाणाऱ्यांची तीन महिने तारांबळ होणार... त्यामुळे गेली आठवडाभर नॉनव्हेज पार्ट्यांना जोर चढला होता. अशात राहुरी तालुक्यातील वेगवेगळ्या बाजारांमध्ये घोरपडींना मोठी मागणी दिसून आली. काहींनी चक्क पोत्यात भरून घोरपडी बाजारात विकल्या. ग्रामीण भागात असलेल्या अनेक गैरसमजुतीमुळे घोरपड या प्राण्याला प्रचंड मागणी आहे. 

जमिनीमध्ये विशिष्ट खोलीच्या अंतरात बीळ करून राहते.घोरपड भक्ष्याच्या शोधात बाहेर पडते. चार पायावर कमरेला जोर देऊन घोरपड धावते.घोरपड हा वन्यजीवन मधील संकटग्रस्त प्राणी असून घोरपडीला मारणे हे कायद्याने गुन्हा आहे. घोरपडीचे शिकार केल्यास 3 वर्ष कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते .त्यामुळे घोरपड या प्राण्याविषयी पसरणाऱ्या गैरसमज हे केवळ अंधश्रद्धा आहे. बचावासाठी चावा घेणे अथवा आपल्या मजबूत शेपटीने हल्ल्याचा प्रतिकार करणे हा या प्राण्याचा गुणधर्म आहे. 

 

घोरपडीबद्दल सविस्तर माहिती...

घोरपड हा सरपटणार्‍या प्राण्यांपैकी एक पाल सरडा यांच्या प्रवर्गातील प्राणी आहे, तर घोरपड हे सापाप्रमाणे आपली कातडी सोडत असते. घोरपड अंगाने तशी जाड कातडीची असते या प्राण्याला उष्ण आणि ओलसर हवा मानवते, त्यामुळे हा प्राणी नदी-नाल्यांच्या परिसरात राहतो.

घोरपडी ने शेपूट मारल्यास पुरुष नपुंसक होतो असा गैरसमज आहेत. घोरपड हा सरपटणारा सरडा प्रजाती मधील संकटग्रस्त वन्यप्राण्यातून एक आहे. अंधश्रद्धेमुळे घोरपड हा प्राणी वाढत्या शिकारीमुळे संकटग्रस्त झाला असून या प्राण्याविषयी अनेक गैरसमज आहेत. घोरपडीच्या चरबीपासून एक प्रकारचे तेल बनवता येते हे तेल सांधेदुखी बरे करण्यास मदत करते.

घोरपडीचे तेल वात विकारांवर उपयोगी पडते हा केवळ गैरसमज आहे .त्यामुळे असे म्हणतात की घोरपड ने शेवटी मारल्यास ती व्यक्ती नपुंसक होते. मास खाल्ल्याने काही होत नाही तर शेपटाच्या मारा पासून नपुंसकता येऊ शकते हा केवळ अंधश्रद्ध आणि बालिश गैरसमज आहे.

तिला जर कोणी डिवचले किंवा तिच्यावर हल्ला होणार आहे असे तिला वाटल्यास ती मागचे दोन्ही पाय वर करून आपली शेपटी आपल्या शत्रूवर मारत असते.

का मारते तर आपल्या शत्रूपासून संरक्षण करण्याकरता पण आपल्या समाजात जुन्या आणि कालबाह्य झालेल्या काही गोष्टी आहेत.

घोरपड हा सरडा प्रजातीचा एक सरपटणारा प्राणी असला तरी तिचे वजन हे जास्तीत जास्त 100 किलोपर्यंत तर उंची जवळपास पाच फुटांपर्यंत वाढू शकते, पण भारतात एवढी महाकाय घोरपड मिळणे दुर्मिळ आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या