तो व्हिडिओ किरीट सोमैया यांचाच..! व्हायरल केला कुणी..? पोलिसांच्या तपासात महत्त्वाचे अपडेट

मुुंबई : काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान, पोलीस तपासात हा व्हिडीओ खराच असल्याची बातमी समोर आली आहे. व्हायरल झालेला तो आक्षेपार्ह व्हिडीओ किरीट सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे.

परंतु, हा आक्षेपार्ह व्हिडीओ कोणी व्हायरल केला याचा तपास गुन्हे शाखा करणार आहेत.

सोमय्या यांच्यावर महिलांच्या शोषणाचे आरोप
दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावर महिलांच्या शोषणाचे आरोप केले आहेत.
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी हा व्हिडीओ खरा असल्याचा दावा केला आहे. तपास पथकाकडून या व्हिडीओचे विश्लेषण करण्यात आले आहे. संबंधित व्हिडीओ मॉर्फ केलेला नसून, खरा असल्याचे आढळले आहे. मुंबई पोलीस आता हा व्हिडीओ व्हायरल कोणी केला याचा तपास करीत आहेत.
उपमुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ एका वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केला होता. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओचा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. अधिवेशनातील गदारोळानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.


किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ
किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. एका मराठी वृत्तवाहिनीने 17 जुलै रोजी रात्री यासंदर्भात वृत्त प्रसारीत केले होते. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेनंतर किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दानवे यांनी एक पेन ड्राईव्हदेखील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दिला होता. या संपूर्ण प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या