कुकाणा रोडवर अपघात, दोघांचा मृत्यू
बालाजी देडगाव - देडगाव कुकाणा रोडवर स्विफ्ट डिजायर आणि मोटरसायकल अपघात होऊन या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे
सोमनाथ नवनाथ गाले , राहणार मिरी तालुका पाथर्डी , कृष्णा काकासाहेब खाटीक राहणार खाटकवाडी तालुका नेवासा असे मृत झालेल्या तरुणाची नवे आहे नेवासा तालुक्यातील देडगाव कुकाणा रोडवरील काल साडेआठ वाजेच्या सुमारास देडगाव पासून दोन किलोमीटरच्या अंतरावर एम. एच .14 .एफ .जी 0209 स्विफ्ट डिजायर गाडी भरधाव वेगाने कुकाणाकडे जात असताना कुकाण्याहून देडगावकडे येत असलेली मोटर सायकल एम एच16 डि एफ 2486 या गाडीवरील सोमनाथ नवनाथ गाले आणि कृष्णा काकासाहेब खाटीक या दोघांना स्विफ्ट डिझायरने जोराची धडक दिल्यामुळे दोघे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथे भरती करण्यात आले होते मात्र त्यांच्यावर उपचार सुरु असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातानंतर चारचाकी वाहनाचा चालक फरार झाला आहे. घटनेचा पुढील तपास पो नाईक तुकाराम खेडकर हे करीत आहे
0 टिप्पण्या