नगर -
दरोड्याच्या तयारीतील टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून गावठी कट्टासह तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणी नयन राजेंद्र तांदळे (वय 29,) रा. पवननगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर, लियाकत जाफर शेख (वय 36) रा.जेऊर बायजाबाई, ता. नगर, अमोल लक्ष्मण रणसिंग (वय 35) रा. केडगांव, ता. नगर, धुराजी नामदेव महानुर (वय 25) रा. आष्टी, जिल्हा बीड व बजरंग नारायण मिश्रा (वय 35( रा. भिस्तबाग चौक, सावेडी, अहमदनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर बाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.
या विषयी अधिक माहित अशी कि, 25 जुलै रोजी 10.30 वाचे सुमारास सापळा लावुन थांबलेले असताना थोड्याच वेळात एक राखाडी रंगाची कार कॉटेज कॉर्नर रोडने महालाकडे येताना दिसली. पथकाची खात्री होताच चालकास गाडी थांबवण्याचा इशारा करताच त्याने गाडी थांबविली. संशयीतांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे गावठीकट्टा व तीन जिवंत काडतुस, एक कोयता, बटनाचे दोन चाकु,सात मोबाईल फोन, लाकडी दांडके व एक इरटीगा कार असा मुद्देमाल मिळुन आला असुन याना या बाबत अधिक विचारपूस केली असता दरोड्या सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याचे उद्देश या वेळी सांगितले यावेळी आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेत आरोपी विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
0 टिप्पण्या