चत्तर खून प्रकरणी अल्पवयीन ताब्यात


नगर प्रतिनिधी - अंकुश चत्तर खून प्रकरणात आणखी एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्याला बाल न्याय मंडळाकडे हजर केले असल्याचे या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांनी सांगितले. यापूर्वीही तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते.

गुन्ह्यात आतापर्यंत चार अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सराईत गुन्हेगार भाजपाचा नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी मंगळवारी (दि. 25) न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यांना येथील सबजेलमध्ये न ठेवता पुणे येथील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे. अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या