चोरावर मोर : दिवसाढवळ्या मटका बुकीला लुटण्याचा प्रयत्न..!

 

 पुणतांब्यात खळबळ... 

पुणतांबा : गावात असलेल्या मटका चाळीतील काही मटका बुकींना दिवसा ढवळ्या चाकू दाखवून लुटण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मटका बुकी व ग्राम स्था मध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे विशेष पाच वाजेच्या दरम्यान एका मोटार सायकल वर आलेल्या तीन युवकांनी हातात चाकू काढून मटका चाळीतील खोल्या मध्ये मटका घेणाऱ्या बुकीं ना दमबाजी करून लुटण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी मटका खेळण्यासाठी बरीच माणसे आतमध्ये असल्यामुळे आरडा ओरड झाल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. 

 आम्हाला किमान एक लाख रुपये हप्ता दिला नाही तर बघून घेऊ, असा दम ही त्यांनी जातांना दिला. विशेष म्हणजे मटक्या चालणाऱ्या खोलीबाहेर चांगदेवनगर येथील एक व्यक्ती उभी होती. तिची गंचाडी धरून पैसे काढण्याचा दम दिला. मात्र संबधित व्यक्तीने जोरदार प्रतिकार केल्यामुळे लुटारूंनी पळ काढला. 

यापूर्वीही पुणतांबा मटका बुकींना कोयता दाखवून लुटण्याचे प्रकार झाले. पैसेही नेले मात्र दोन नंबरचा धंदा असल्यामुळे त्यानी गप्प राहणे पंसद केले. मात्र हे प्रकार वाढत असल्यामुळे त्यांनाही आता 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे पुणतांबा गावात अवैध धंद्यांनी चांगलाच जम बसविला आहे. गावात गुंडगिरीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गुन्हेगारांना खाकीचा धाक राहिला की नाही? याबाबद ग्रामस्थामध्ये साशंकता निर्माण झाली आहे. राहाता पोलीस स्टेशनला नुकतेच नवीन पोलीस निरीक्षक नियुक्त झाले आहे. त्यांनी तातडीने पुणतांबा परिसरातील गुंडगिरी करणारावर पोलीसी हिसका दाखवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या