मनसैनिकांनी समृद्धीचा टोलनाका फोडला!

 अमित ठाकरेंची कार अडविली..




शिर्डी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित राज ठाकरे यांची कार अडविल्याने संतप्त मनसे सैनिकांनी समृद्धी महामार्गाचा सिन्नर येथील टोलनाक्याची तोडफोड केली. अमित ठाकरे या महामार्गावरून गेल्यानंतर हा प्रकार घडला.


गेल्या ३ दिवसांपासून अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यानंतर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अमित ठाकरेंचा ताफा मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी सिन्नरजवळील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अमित ठाकरेंची कार अडवण्यात आली. काही काळ अमित ठाकरेंना तिथे थांबावे लागले. फास्टटॅगच्या तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाल्याची माहिती आहे. मात्र त्यानंतर अमित ठाकरे तिथून निघून गेले. पण मनसे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रागाच्या भावनेतून या टोलनाक्याची तोडफोड केली. 

२-३ वाहनांमधून मनसे कार्यकर्ते टोलनाक्याला दाखल झाले होते. त्यांनी टोलनाक्याच्या केबिनमधील काचा फोडल्या आणि त्याठिकाणाहून निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी दहा ते पंधरा मनसे सैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

_______


... त्यात एकाची भर पडली


शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन जाताना सिन्नर जवळील टोल नाक्यावर फास्टटॅग असतानाही रॉड खाली आला. तेथील प्रतिनिधीने तांत्रिक बिघाड असल्याचे कारण सांगितले. मात्र कार सोडली नाही. मॅनेजरनेही उद्धट उत्तर दिले. दहा मिनिटानंतर कार सोडण्यात आली. मी पुढे नाशिकला पोहोचल्यानंतर काही लोकांनी टोल नाका फोडल्याचे समजले. राज ठाकरे यांच्यामुळे राज्यातील 65 टोलनाके बंद झाले. माझ्यामुळेच त्यात एकाची भर पडली.

- अमित ठाकरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या