पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन यांची कामगिरी |
मोटर सायकल चोरताना सापडले खतरनाक दहशतवादी!
एनआयएच्या लिस्टवर असलेले दोन दहशतवादी केले पुणे पोलिसांनी अटक
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात पोलिसांनी तिघा दुचाकी चोरांना पकडले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची माहिती एटीएसला ( दहशतवाद विरोधी पथक) देण्यात आली. पोलिसांनी जसजसा चौकशीचा फास आवळला तसतसे धक्कादायक खुलासे होत गेले. पोलिसांनी पकडलेल्या संशयतांपैकी दोघे दुचाकीचोर चक्क मोस्ट वॉन्टेड आणि एनाआयएच्या रडारवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचा पुण्यात घातपाताचा कट तर नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.
पुणे पोलिसांकडून सध्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर गस्त व पेट्रोलिंगवर भर दिला जात आहे. कोथरूड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन यांनी दुचाकी चोरीच्या संशयातून तिघांना हटकले. मात्र, त्यांची हालचाल ही संशयास्पद दिसली. कर्मचाऱ्यांनी लागलीच मदत बोलवत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली. त्या दरम्यान त्यांच्याकडे एक लॅपटॉप, चार मोबाइल तसेच बनावट आधारकार्ड मिळाले. मोहमद युनुस साकी व इम्रान खान अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
सखोल चौकशी केल्यानंतर काही गोष्टी संशयास्पद आढळल्या. पुणे पोलिसांनी एटीएसला माहिती देण्यात आली. दिवसभर या दोघांकडे चौकशी केल्यानंतर ते NIA कडून फरार असलेले दहशतवादी असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून जप्त केलेला मोबाइल, लॅपटॉप यांची तपासणी सुरू केली आहे. तर NIA आणि इतर यंत्रणा देखील पुण्यात दाखल झाल्या आहेत. राजस्थान चितोडगड याठिकाणी NIA एक कारवाई केली होती. तेव्हा काही स्फोटक पकडले गेले होते. त्या गुन्ह्यात हे फरार आहेत. NIA कडून या आरोपीवर 5 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली.
पोलिसांनी रात्रीच्या वेळी कर्तव्य तत्परता दाखवत इतक्या मोठ्या गुन्हेगारांना जेरबंद केल्याने त्यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, ज्यावेळी हे संशयित दुचाकी चोरत होते त्यावेळी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्याच्या कामात पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि पोलीस अंमलदार अमोल नजन यांनी आपले कामगिरी चोख पार पाडली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले हे दोघे जण राजस्थानमध्ये मोस्ट वाँटेड असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ते देशविघातक कृत्यात गुंतलेले असून एनआयएचे पाच लाखांचे बक्षीसही त्यांच्यावर आहे. साधे दुचाकी चोर इतके मोठे गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यांना पकडण्यात कोथरूड पोलीस ठाण्यातील प्रदीप चव्हाण आणि पोलीस अंमलदार अमोल नजन यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या