BRS: भारत राष्ट्र समिती कार्यकर्त्यांचा उद्या शनिवारी श्रीरामपूरात मेळावा

 



श्रीरामपूर - भारत राष्ट्र समितीच्या श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा उद्या शनिवार ता.२९ रोजी दु.२ वा. उत्सव मंगल कार्यालय, श्रीरामपूर येथे होणार आहे . महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी समितीचे सदस्य माणिक कदम, माजी आ. भानुदास मुरकुटे, गंगापूरचे माजी आ. अण्णासाहेब माने, घनःश्याम शेलार, कदिर मौलाना, नाशिक विभाग प्रमुख नानासाहेब बच्छाव व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती मार्केट कमिटीचे संचालक तथा उत्तर नगर जिल्हा समन्वयक मयूर पटारे यांनी दिली.

          माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी नुकताच तेलंगणा राज्याच्या दौरा केला. या दौ-यात त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे उपस्थितीत भारत राष्ट्र समिती (बी.आर.एस.) पक्षात कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

          या पक्ष प्रवेशाबद्दल आपली भुमिका आणि पुढील रूपरेषा याबाबत कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करण्याच्या दृष्टीने सदरच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी शनिवार ता.२९ जुलै रोजी दु.२ वा. मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पटारे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या