निपाणी येथील रमेश पवार खून खटला
श्रीरामपूर : निपाणी वडगाव येथील रमेश पवार खून खटल्यामध्ये आरोपी असलेल्या अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सोपान राऊत याचा जमीन फेटाळण्यात आला. जिल्हा सत्र न्यायाधीश संजय यादव यांनी हा निकाल दिला.
प्रसिद्ध वकील अँड. हर्षद निंबाळकर यांनी सोपानराव यांच्या वतीने शुक्रवारी युक्तिवाद केला होता. राऊत यांच्याविरुद्ध पोलिसांकडे कुठलाही पुरावा नसताना त्यांना आरोपी करून नंतर पुरावे शोधण्याची पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र आज राऊत याचा जमीन फेटाळण्यात आला.
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मद्यपी पती रमेश पवार यांचा गळा दाबून पत्नीनेच खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. तालुक्यातील निपाणी वडगाव येथे 4 एप्रिल 2023 रोजी मध्यरात्री हा खून झाला. अंत्यविधीची घाई सुरू असताना गावातून पोलिसांना खबर मिळाल्याने हा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी सविता रमेश पवार (वय 40) हिला दोन महिन्यांनी जूनमध्ये अटक केली. त्यानंतर घटनाक्रम उलगडला.
या प्रकरणात एकूण चार आरोपी असून सविता पवार व अजय गायकवाड हे दोघे अटकेत आहेत. राऊत व प्रसाद भवार हे दोघे फरार आहेत. राऊत व भवार यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. राऊत यांच्यावतीने विधीज्ञ हर्षद निंबाळकर यांनी तर भवारच्या वतीने विधीज्ञ बाबा औताडे यांनी युक्तिवाद केला होता.
पोलिसांच्या वतीने सरकारी वकील प्रसन्न गटने यांनी बाजू मांडली. पवार खून खटल्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज (17 जुलै) रोजी जमीन फेटाळला. सरकारी वकील प्रसन्न गटने यांनी 'आरोपीविरुद्ध सबळ पुरावे आहेत मात्र ते उघड करू शकत नाही', असे सांगत पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचे जवळपास 500 पानांचे दप्तर न्यायालयाला अवलोकारणासाठी सादर केले होते. त्याआधारे हा निकाल झाला.
0 टिप्पण्या