Crime : बदनामीच्या भीतीने 29 जुगारी बनले कोंबडे..!

  •  बड्या मटका, जुगार अड्ड्यावर छापेमारी... २९ जणांना अटक
  • सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी मॅडम यांची कारवाई....


Dipak Barkase / Rashtra Sahyadri 

वैजापूर : 


वैजापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात मध्यवर्ती ठिकाणी  बिनधास्तपणे सुरू असलेल्या दोन मटका अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांच्या पथकाने छापा टाकून २९ जुगाऱ्याना ताब्यात घेत ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केल्यानंतर बदनामीच्या भीतीने जुगारींची अवस्था कोंबड्यासारखी झाली. 


वैजापूर  पोलीस ठाण्याच्या हद्दीत दबंग महिला पोलीस अधीक्षक महक स्वामी मॅडम यांनी अवैध धंदे विरुद्ध कारवाईचा बडगा उगारून भल्या  भल्या ची झोप उडवली होती. तात्कालीन पोलीस निरीक्षकानी कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका बजावली होती त्याचाच एक भाग म्हणून त्यांची वरिष्ठांनी बदली केली आणि नवीन पोलीस निरीक्षकांनी सूत्रे हाती घेतले. त्या दिवसापासून 

 अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला असून अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरु असल्याचा अनेक तक्रारी  प्रसार माध्यमाद्वारे व्यक्त केल्या जात होत्या.

काही काळ विश्रांती घेत दिनांक 31 जुलै सोमवार रोजी पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार औरंगाबाद ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली मा.सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी उपविभाग बैजापुर यांच्या पथकाने  गोपणीय माहीती काढून वैजापुर शहरातील स्वास्तिक टॉवर मध्ये व लाडगाव कमान जवळ  मटका नावाचा जुगार अड्ड्यावर छापा टाकून   नानाजी जिजाबा सोळसे वय ७० वर्षे रा. तिडी ता. वैजापुर, बबन दगडु वराडे वय ७० वर्षे रा. शिरसगाव ता.वैजापुर, देवचा लक्ष्मण गांगुर्डे वय ५० वर्षे रा. लोणी ता. वैजापुर, बाबासाहेब लाला साळवे वय ५२ वर्षे रा. चिंचडगाव ता. वैजापुर, कैलास त्रिंबक त्रिभुवन वय ५२ वर्षे रा. जानेफळ ता. वैजापुर, युसुफ अब्दुल रहीम चाऊस वय ३६ वर्षे रा. परदेशी गल्ली वैजापुर, सुभाष धोंडीराम राजपुत वय ५८ वर्षे रा. सटाणा ता. वैजापुर, सिकंदर उस्मान पठाण वय ५० वर्षे रा. लाखपानव ता. वैजापुर, दिपक नामदेव म्हस्के वय २५ वर्षे रा. तिडी ता. वैजापुर, अर्जुन शिवाजी घाडगे वय २३ वर्षे रा चिंचडगाव ता.वैजापुर,  भाऊसाहेब रामराव गायकवाड वय ३५ वर्षे रा. लोणी ता. वैजापुर, रमेश शंकर गवळी वय ३० वर्षे रा. तिडी ता. बैजापुर, जगन भाऊराव त्रिभुवन वय ४० नगिना पिंपळगाव ता. वैजापुर, आनंद मदनसिंग राजपुत वय ३५ वर्षे रा. परदेशी गल्ली ता. वैजापुर, शंकर सुखलाल लोधे वय ३७ वर्षे रा. इंदिरा नगर ता. बैजापुर, मंगेश संजय साळवे वय २५ वर्ष रा. चिंचडगाव ता. वैजापुर, आमीन पठाण शेख वय ३२ वर्षे रा. भायगाव ता. वैजापुर, गुलाब गफार शेख वय ४० वर्षे रा. माळी घोगरगाव ता. वैजापुर,  कैलास अभिमन्यु ठाकरे वय ६० वर्षे रा. अगरसायगाव ता. वैजापुर, भागीनाथ दादा म्हस्के वय २७ वर्षे रा. तिडी ता. वैजापुर,  बाबासाहेब माधव गवळी वय ४५ वर्षे रा. चिंचडगाव ता. वैजापुर,  अजय मदनसिंग राजपुत वय ३० वर्षे रा. परदेशी गल्ली वैजापुर,  अनिल ज्ञानेश्वर म्हस्के वय २२ वर्षे रा. तिडी ता. वैजापुर,  कैलास संपत सावंत वय ५५ वर्षे रा. म्हस्की ता. वैजापुर, गणेश अरुण राजपुत बय ३५ वर्ष रा. परदेशी गल्ली वैजापुर, आबा वाघ, बंटी त्रिभुवण, अमोल बाबुराव सुरसे वय २५ वर्षे रा. पाटील गल्ली, आण्णा काशिनाथ शिंदे वय ३९ वर्षे रा. वडारवाडा ता. वैजापुर असे एकुण २९ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या  ताब्यातुन  ०३ मोसा, १३ मोबाईल व रोख रुपये असा एकूण ३,७०,१९०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सदरील कारवाई मा. पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार औरंगाबाद ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी उपविभाग वैजापुर, पोउपनि श्रीराम काळे, पोना सरोदे, पोकों  मोरे, पोकों जोनवाल, पोकों गायकवाड, पोकों  कदम  यांनी केली आहे.

 पुढील तपास पोलीस ठाणे वैजापुर करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या