CRIME NEWS : कांदे खून प्रकरणातील दोघे 24 तासात अटकेत..!

 



श्रीरामपूर : जबरी चोरीच्या उद्देशाने श्रीरामपूर शहरानजी गोंधवणी येथील तरुणाचा खून करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 24 तासात अटक केली.  मथुर विजय काळे वय २१, रा. रेणुकानगर सुतगिरणी, ता. श्रीरामपूर व किरण सुरेश काकफळे वय-२४, रा. रमानगर, सुतगिरणी, ता.श्रीरामपूर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 


आठ जुलै रोजी गोंधवणी येथील सुधीर अशोक कांदे या 35 वर्षीय तरुणाचा धारदार शास्त्राने वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी मयत सुधीर कांदे याचे मामा नवनाथ दादासाहेब चौधरी (वय-४१, रा. भैरवनाथ नगर, गोंधवणी, ता. श्रीरामपूर) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला. त्यात मथुर काळे व किरण काकफळे यांची नावे समोर आली. सुधीर कांदे हे रस्त्याने पायी जात असताना मोटरसायकल वर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यास निर्जन स्थळी नेऊन चाकूने वार करून खून केल्याची कबुली दोघांनी दिली. 



   सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस हवालदार दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, विजय वेटेकर, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, संदीप चव्हाण, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या