नगर : मोक्का व दरोडेच्या गुन्ह्यात गेल्या पाच वर्षापासून फरार असलेला मिथुन मंड्या काळे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. नन्नवरे रस्ता लूट प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.
11 फेब्रुवारी 2019 रोजी दत्तात्रय बंडू नन्नवरे कुटुंबीयसह कारने जाताना त्यांना रस्त्यात अडवून सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज मिथुन काळे याने लुटून नेला होता. याप्रकरणी नन्नवरे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या गुन्ह्यात काळे याच्यासह पाच जणांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यातील दोघांना पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या होत्या. मिथुन काळे मात्र फरार होता. स्थानिक पुणे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणाचा समांतर तपास केला. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तो राहत्या घरी असल्याची खबर मिळाली. त्यावेळी पोलीस पथकाने छापा टाकून त्याला अटक केली. मिथुन काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नजर सोलापूर पुणे जिल्ह्यात दरोडा तसेच रस्ता लुटीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस हवालदार दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, विजय वेटेकर, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, संदीप चव्हाण, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
0 टिप्पण्या