थत्ते मैदान बनले गुन्हेगारीचा अड्डा
श्रीरामपूर : क्रिकेट खेळण्यातून झालेल्या वादात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. श्रीरामपूर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या थत्ते मैदानावर हा प्रकार घडला. मारहाण करणाऱ्या तरुणांनी यापूर्वी देखील अनेकांना याच पद्धतीने मारले असताना तडजोड करून सुटण्याची त्यांची मोडस असल्याची चर्चा आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 15 जुलै सायंकाळी थत्ते मैदानावर क्रिकेट खेळण्याच्या वादातून काही तरुणांमध्ये हाणामारी झाली. त्यात नारायणे नावाचा मुलगा डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. चव्हाण आणि कांबळे नावाची काही मुले या वादात होती.
कोणी कोणाला मारले? का मारले? याबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या जात आहेत. पोलीस ते पडताळत असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान शहरातील उच्चभ्रू वसाहतीत असलेल्या प्रत्येक मैदानाला सध्या गुन्हेगारी अड्ड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खून, मंगळसूत्र ओरबाडणे, महिला-मुलींची छेडछाड असे गंभीर गुन्हे या परिसरात घडतात. याशिवाय खुल्या मैदानात सर्रास दारू पिणाऱ्यांची देखील रात्री उशिरापर्यंत तेथे वरदळ असते.
0 टिप्पण्या