Crime : तरुणाच्या मृत्यूचे दोनदा शिवविच्छेदन

 

खुनाचा गुन्हा आत्महत्या दाखवून लपवण्याचा प्रयत्न फसला



आईच्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा


दादा सोनवणे l rashtra sahyadri




श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली येथील युवकाने मालकासोबत झालेल्या किरकोळ वादातून आत्महत्या केल्याचे बोलले जात असताना नातेवाईकांनी हा घात असल्याची शंका व्यक्त केल्यावर पोलिसांनी समाधान यांच्या मृतदेहाचे पुन्हा एकदा शवविच्छेदन केल्यावर ती आत्महत्या नसून खूनच असल्याचे सिद्ध झाले. मयताच्या आईच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तब्बल ७ जनावर रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

                                                  

श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली येथील समाधान अंकुश मोरे हा दिलीप मांडे यांच्याकडे ट्रॅक्टर चालक म्हणून नोव्हेंबर 2022 ते मे 2023 दरम्यान ट्रक्टर चालक म्हणुन कामास होता. या कालावधीमध्ये काम करत असताना त्यांचा किरकोळ कारण तसेच ट्रॅक्टर चालक व्यतिरिक्त इतर काम दिलीप मांडे तसेच प्रविण मांडे हे त्याला सांगत असल्याने समाधान व त्यांचेमध्ये त्या कारणावरुन वाद होत होते.


 त्याबाबत समाधान मला वेळोवेळी सांगत असे. मे 23 मध्ये समाधान यांने दिलीप मांडे यांचेसोबत होत असलेले वादामुळे त्यांचे ट्रॅक्टर वरील काम सोडुन तो घरीच शेती करत असे. त्यानंतर साधारण 08 ते 10 दिवसापुर्वी दिलीप मांडे हे समाधान यांस टॅक्टर ट्रॉलीचे काम करायचे आहे, असे सांगुन त्यांस घेवुन गेले होते परंतु त्यांचेमध्ये व समाधान मध्ये वाद झाल्याने समाधान काही काम न करता परत आला होता. त्यानंतर दि 14 जुले रोजी रात्री ७ चे सुमारास मयताची पत्नी व त्यांचा मुलगा संतोष व समाधान असे घरी असताना दिलीप गणपत मांडे रा. मढेवडगाव ता. श्रीगोंदा हा व त्यांचे सोबत पाडुरंग उंडे हा पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो गाडी नं MH-16-AT-1545 घेवुन आमचे घरी आले.

 घरी आल्यानंतर दिलीप मांडे हे म्हणाले कि माझे ट्रॅक्टरला ड्रायव्हर नसल्यामुळे उभा आहे. तसेच मला ट्रॉली दुरुस्त करायची आहे. तेव्हा तुमचा मुलगा समाधान यास माझे सोबत ड्रायव्हर म्हणुन पाठवा, त्यावेळी समाधान हा दिलीप मांडे यांचेसोबत होत असलेले वादामुळे त्यांचे सोबत कामावर जाण्यास नकार देवु लागला, त्यावेळी दिलीप मांडे हा वारंवार विनवणी करु लागल्याने माझा मुलगा संतोष हा समाधान यास तु एक दिवस कामावर जा मी उदया तुला घेण्यासाठी येतो असे सांगितलेने समाधान हा दिलीप मांडे यांचेसोबत बोलोरेका गाडीत बसुन गेला. दिनांक 15 जुले रोजी सकाळी ६च्या सुमारास संतोष यास दिलीप मांडे याचा फोन आला व तु लवकर मढेवडगावला ये तुझ्याकडे काम आहे असे सांगितले. त्यानंतर संतोष हा मोटार सायकलवर मढेवडगाव येथे गेला. त्यानंतर १० चे सुमारास फिर्यादीची मोठी जाऊ रेखा अशोक मोरे यांनी मला सांगितले की, दिर रामदास आबा मोरे यांनी मला फोन करुन सांगीतले की, समाधान यांने मढेवडगाव येथे मांडे यांचे घरी फाशी घेतलेली आहे. त्यानंतर माझे मुलाचे प्रेत हे ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे आणले होते.

 

 मुलाचे प्रेतावर पोस्ट मॉर्टम् केले तेव्हा मुलाचा खुन केला आहे, अशी शंका आल्यावर फिर्यादीने मयताचे परत पोस्ट मॉर्टम करावे याबाबत तक्रारी अर्ज दिला. तेव्हा मुलाचे प्रेताचे पोस्ट मॉर्टम हे पुन्हा ससुन हॉस्पीटल पुणे येथे केले आहे. तेव्हा तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी मुलगा समाधान मोरे यांस छातीला व डोक्याला मारहाण झाली आहे त्यामुळेच तो मयत झाला आहे. असा अहवाल दिला आहे. त्यावरून फिर्यादीच्या मुलाचा घात झाला आहे हे लक्षात आले म्हणुन फिर्यादी यांनी दिलीप मांडे, पाडुरंग उंडे व प्रविण मांडे रा. मढेवडगाव यांचे बरोबर यापुर्वी झालेले वादामुळे त्यांनी माझा मुलगा समाधान अंकुश मोरे यांस मारहाण करुन त्याचा खुन करुन त्यांस फाशी देउन झाडाला लटकवला आहे.

 

 याबाबत त्यावरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलीप गणपत मांडे, पाडुंरंग उंडे, प्रविण दिलीप मांडे ,अभि दिलीप मांडे, बाळासाहेब मांडे ,अक्षय त्रंबक मांडे, आकाश बाळासाहेब मांडे सर्व रा. मढेवडगाव ता. श्रीगोंदा यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादंवि ३०२ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी भेट दिली असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे करत आहेत.


चुकीचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरचे काय ?

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी समाधान मोरे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर ती आत्महत्याच आहे असे असा अहवाल देण्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्याच मृतदेहाचे पुन्हा ससून या ठिकाणी शवविच्छेदन केल्यानंतर तो खून आहे, असे उघडले झाले. त्यामुळे श्रीगोंदातील शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी असा का अहवाल दिला? याचाही तपास घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या