Guru Purnima: सद्गुरुशिवाय जीवनात यश प्राप्ती नाही : हभप नवनाथमहाराज माशेरे

 

( पारनेर प्रतिनीधी : दत्ता गाडगे)


पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्रीसंत निळबाराय पायी दिंडी पालखी सोहळ्याच्या आषाढी वारीची दि.३ जुलै रोजी काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. सकाळी १० ते १२ या वेळेमधे हभप नवनाथ महाराज माशेरे यांनी 



" पाहाती गौळणी, तंव पालथी दुधाणी,। म्हणती नंदाचिया पोरें । आजी चोरी केली खरें ॥ध्रु.॥ "


या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर सविस्तर निरुपन केले. 


     यावेळी बोलताना महाराज म्हणाले,मनुष्याला जर यशस्वी जीवनाचा करायचा असेल तर प्रत्येकाला गुरु हा करावाच लागतो. 

सद्गुरुशिवाय जीवनात यश प्राप्ती होतच नाही.गुरुमुळेच आपल्याला जीवनात यशप्राप्ती,सुखप्राप्ती, आणि समृद्धीचा मार्ग सापडतो. आपले पहिले गुरु म्हणजे आई,वडील.शालेय शिक्षण घेताना त् जे आपल्याला शिकवतात तेसुध्दा आपले गुरुच आहेत.


 श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे श्रीसंत निळोबाराय महाराजांच्या संजीवनी समाधी मंदिरासमोरील प्रांगणामधे आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याच्या सांगता समयी आयोजित किर्तन सेवेमधे हभप नवनाथ महाराज माशेरे बोलत होते. यावेळी बोलताना महाराज म्हणाले,गुरुप्रति लिन होण्याचा आणि गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे.त्यासाठीच गुरुपौर्णिमा साजरी करावी लागते. त् १३ जून ते ३० जून या काळात श्रीक्षेत्र पिंपळनेर ते पंढरपूर असे श्रीसंतनिळोबारायांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा समारोप बरोबर गुरु पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे काल्याच्या किर्तनाने होत असतो.सध्या गोहत्या फार मोठे पाप आहे.प्रत्येकाने घरासमोर गायीचे पालन केले पाहिजे.आज गाई वाचली तरच आपण वाचणार आहोत त्यासाती कुणीही आपली गाई कत्तलखान्यात पाठवू नका तिचे पालन करावे असे महाराजांनी सर्वांना केले.



पुढील वर्षी पिंपळनेर ते पंढरपूर आषाढी वारी साठी होणाऱ्या पालखी सोहळ्याच्या रथासाठी पारनेर तालुक्यातील रांधे येथील दिंडी सोहळ्याने बैल जोडी देण्यासाठीचा श्रीफळ स्विकारला असुन,रथ सजावटीसाठी लागणारा सर्व खर्च रांधेकर करतील असे मा.सरपंच संतोष काटे यांनी सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीत,दिंडी चालक एकनाथ आवारी,संपत कड यांचे वतीने असे सांगीतले.



यापूर्वी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी देवस्थानसाठी खुप मोठा निधी दिलाय.तसे राष्ट्रवादी काँग्रेस हे माझे कुटुंब आहे,आदरणीय शरद पवार साहेब हे आमचे कुटुंबप्रमुख असुन,ना.अजितदादा पवार व सुप्रियाताई सुळे हे आमचे नेते, कुटुंब प्रमुख आहेत.ह्या कुटुंबातील मी एक छोटासा सदस्य आहे.सद्याच्या बदलेल्या राजकीय परिस्थितीत पवार कुटुंबासह,सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींनी एकत्र राहावे अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे. तरी, सर्वाना अपेक्षित व योग्य निर्णय व्हावा अशी मागणी मी तमाम वारकरी व भाविकभक्तांचे वतीने करतो.
-  अशोकराव सावंत 
कार्याध्यक्ष, श्रीसंत निळोबाराय संस्थान, 
अध्यक्ष, पारनेर,नगर विधानसभा मतदार संघ.

 


 याप्रसंगी श्रीसंतनिळोबाराय पायीदिंडी पालखी सोहळा प्रमुख व निळोबारायांचे वंशज गोपाळकाका मकाशीर,निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे, कार्याध्यक्ष अशोकराव सावंत, सुरेशपठारे, किरण पठारे निळोबाराय देवस्थानचे सचिव लक्ष्मण खामकर, निळोबाराय सेवाभावी ट्रस्टचे सचिव चांगदेव शिर्के, हभप दिनकर पिंगळे, अनिल पोटे,राजेंद्र पठारे,विजय गुगळे,बाळासाहेब गाडे, राजेंद्र रासकर,बापू पानसरे,माजी सरपंच भाऊसाहेब लटाबंळे तसेच सर्व ६१ दिंड्यांचे चालक,विणेकरी,वारकरी व भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या