राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला; एकविरा चौकात थरार
भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह 10 जणांवर गुन्हा; चौघे ताब्यात
नगर : सावेडी उपनगरातील एकविरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल (15 जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. धारदार शस्त्राने तसेच लोखंडी रॉडने वार केल्याने अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले आहेत. लहान मुलांच्या भांडणातून हा वाद झाला असला तरी पूर्व वैमानस्याची त्याला किनार असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले असून नगरसेवक स्वप्नील शिंदे फरार आहे.
अंकुश चत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असून आमदार संग्राम जगताप यांचे निकटवर्तीय आहेत. एकविरा चौकात खेळण्यातून लहान मुलांची भांडणे झाली होती. सुरुवातीला ती भांडणे सोडवण्यासाठी चत्तर यांनी आपल्या भाच्याला पाठविले. नंतर ते स्वतः तिथे गेले.
त्यावेळी फुलारी नावाच्या व्यक्तीने त्यांना चर्चेसाठी बाजूला बोलावले. त्यांचे एकमेकांशी बोलणे सुरू असताना दोन दुचाकीवरून काही लोक तेथे आले. त्यांच्यापाठोपाठ दोन काळ्या रंगाच्या कारमधून आणखी आठ दहा लोक आले. त्यांनी लोखंडी रॉड, वायर रोपसह धारदार शास्त्राने चत्तर यांच्यावर हल्ला चढविला. 'स्वप्निल भाऊला नडतो का'? अशी विचारणा करत चत्तर यांना जबर मारहाण करण्यात आली. ते जखमी अवस्थेत पडलेले असताना भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे तेथे आले. 'हा संपला का रे? संपला नसेल तर त्याला संपवा..' असे त्यांनी मारहाण करणाऱ्यांना म्हटले. त्यानंतर पुन्हा चत्तर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपा नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह आठ ते दहा जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, चत्तर यांच्यावर मॅककेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
तोफखाना पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. नगरसेवक स्वप्नील शिंदे मात्र फरार आहे.
अहमदनगरशहरात गेल्या काही दिवसांपासून अशा घटना वाढल्या असून यामुळे नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान पोलीस घटनास्थळाची पाहणी करत असताना त्या ठिकाणी काही अंतरावर असलेली एक चहाची टपरी अज्ञातांनी पेटवून दिली. या घटनेचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती तोफखाना पोलिसांकडून देण्यात आली आहे.
भरबाजारात दोन व्यापाऱ्यांवर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर शहरात तीन महिन्यांपूर्वी घडली होती. हल्ल्यात दोघेही व्यापारी जखमी झाले होते. दीपक नवलानी आणि प्रणिल बोगावत अशी हल्ला झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. कापड बाजारातील व्यापाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
3 टिप्पण्या
สล็อต pgplay168 เว็บไซต์พนันออนไลน์ที่ให้บริการเกมออนไลน์อย่างมีคุณภาพโดยเฉพาะอย่างยิ่ง pgslot เพราะเหตุว่าเป็นเว็บไซต์ที่มีคุณภาพ เหมาะสมแก่การเข้าไปพนันสร้างกำไรอีกรอบๆ
उत्तर द्याहटवाทางเข้าเล่น PG SLOT เกมบนสมาร์ทโฟน พูดได้ว่าเป็นอีกหนึ่งหนทางบริการสำหรับเพื่อการเข้าเล่นเกมสล็อตออนไลน์ กับเว็บ PG SLOT ที่มีโปรโมชั่นดี โดนๆมามอบกับสมาชิกทุกคน เพียงแต่คลิก
उत्तर द्याहटवाหาเงิน ช๊อปปิ้ง กับ pg slot ที่ช่วยคุณได้ วันนี้พวกเรามานำเสนอด้วยเกมออนไลน์มีความน่าดึงดูดใจ ช่วยให้พวกเรานั้นไปกับพวกเราได้เลย pg slot ซึ่งเป็นการหารายได้ที่บรรเทามากมาย
उत्तर द्याहटवा