Zilla Parishad: प्रशासक लागू असताना जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची मनमानी

  निविदा कालावधी संपूनही अधिकारी निविदा उघडत नाही...सुजित झावरे पाटील यांचा आरोप





 datta Gadage : Rashtra Sahyadri

पारनेर: 

अहमदननगर जिल्हा परिषदेमधे सध्या प्रशासक लागू आहे.त्यातच सरकारमध्ये सातत्याने होत असलेल्या फेरबदलामुळे काही अधिकारी याचा गैरफायदा घेत असुन,मंत्र्यांची कारणे पुढे करत मनमानी करत असल्याचे दिसून येत आहे.

छाया : दत्ता गाडगे 


याबाबत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची आज अहमदनगर जिल्हा परीषदेचे मा.उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेतली.तसेच संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या दालनामध्ये बोलावले व विचारणा केली.यावेळी शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीच्या निविदा कालावधी संपून, महिना सुध्दा उलटून गेला आहे. तरी संबंधित अधिकारी निविदा विशिष्ट ठेकेदाराला काम मिळत नाही म्हणून निविदाच उघडत नाही.तरी,सदर बाब अत्यंत गंभीर असून शासन निर्णयाची पायमल्ली अहमदनगर जिल्हा परिषदेच्या  बांधकाम व पाणीपुरवठा विभागाकडून होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे झावरे यांनी सांगीतले. 



     या विषया बाबत मुख्य कार्यकारी  अधिकारी येरेकर यांनी दोन दिवसात कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हा परिषद सेस, १५ वा वित्त आयोग, एकूण अनुदानाच्या व्याजाचे नियोजन याबाबत जिल्हा परिषदेने श्वेतपत्रिका काढावी अशी देखील मागणी जि.प.चे मा.उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी यावेळी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या