पुन्हा एकदा गोल्ड व्हॅल्यूअरने बँकेला घातला 22 लाखाला गंडा

संगमनेर - आधीच चार बँकांना गंडविणाऱ्या गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणेसह इंडियन ओव्हरसीज बँकेचा गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश म्हसेचा नवा फ्रॉड समोर आला आहे. आरोपींमध्ये म्हसे, शहाणे या दोघा सोनारांसह पाच जणांचा समावेश आहे. बँकेचे शाखाधिकारी निवृत्ती काळू नव्हाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 27 जुलैला आरोपींविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जग


दीश सुभाष म्हसे (रा. घुलेवाडी, संगमनेर), उत्तम विश्वनाथ पानसरे (रा. वाघापूर, संगमनेर), लहानु किसन नेहे (रा. नांदुरी दुमाला, संगमनेर), मंगेश संपत दिघे (रा. कोल्हेवाडी, संगमनेर) व जगदीश लक्ष्मण शहाणे (रा. घुलेवाडी, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

कर्जदारांनी बँकेत ठेवलेल्या सोन्याची वैधता व शुद्धता तपासणी करिता बँकेने जगदीश सुभाष म्हसे याची मूल्यांकनकार म्हणून नेमणूक केली होती. बँकेच्या नियमित सहामाही सोनेतारण पर्यवेक्षण अहवाल तपासणीकरिता बँकेने चंद्रकांत डहाळे व बँक इन्स्पेक्टर नवनीत कटियान (वरिष्ठ प्रबंधक इंडियन ओव्हरसीज बँक नाशिक रोड) यांना पाठविले असता त्यांनी बँकेत तारण ठेवण्यात आलेल्या सोन्याची तपासणी केली असता दहा सोनेतारण पिशव्यांमधील सोने बनावट व अनधिकृत असल्याचे आढळून आले.

यांच्या नावावर संगनमताने गोल्ड व्हॅल्यूअर म्हसेने केला घोटाळा: सोने बनावट व अनधिकृत असल्याचे आढळून आल्यानंतर बँकेने गोल्ड व्हॅल्यूअर म्हसे याला विचारणा करण्यासाठी बँकेत बोलावले असता त्याने लेखी हमीपत्राद्वारे सोने धारण कर्जदार उत्तम विश्वनाथ पानसरे, लहानु किसन नेहे, मंगेश संपत दिघे व जगदीश लक्ष्मण शहाणे यांच्या नावाने बँकेत ठेवलेल्या दहा कर्ज प्रकरणातील बनावट सोने प्रकरणातील कर्जाची रक्कम स्वतःच्या आर्थिक अडचणींची पूर्तता करण्यासाठी वापरली असल्याचे व त्या रकमेची भरपाई देण्याची जबाबदारी स्वतःची असल्याचे बँकेस लिहून दिले. त्यानंतर लहानु किसन नेहे, मंगेश संपत दिघे यांनी जगदीश म्हसेच्या मदतीने त्यांचे कर्ज खाते पूर्णतः तसेच उत्तम विश्वनाथ पानसरे यांनी त्याच्या कर्ज खात्यापैकी एका खात्यावरील संपूर्ण रक्कम भरणा केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

 या प्रकरणी  संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या