भिडेचें धोतर फेडणाऱ्याला 51 हजाराचे बक्षीस जाहीर


श्रीगोंदा प्रतिनिधी ;-  देशातील राष्ट्रपुरुषांचा व देवतांचे जाहीर अवमान करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी तसेच मनोहर भिडे यांचे धोतर फेडणाऱ्याला महात्मा फुले युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने ५१ हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे 

  राष्ट्रीय राष्ट्रपुरुषांचा जाहीर अवमान करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी यासाठी ग्रामस्थांकडून संभाजी भिडे यांच्या विरोधात मंगळवारी तहसील कार्यालयाच्या आवारात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. म

. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचा ग्रामस्थांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग यांच्यात संतापाची लाट निर्माण झाली होती. संभाजी भिडे यांच्या विरोधात निम का पत्ता कडवा है संभाजी भिडे कडवा है अश्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

यावेळी शहरातून मिरवणूक काढत भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आले त्यावेळी अनेक व्यक्त्यांनी आपला निषेध नोंदविला तर मनोहर भिडे यांचे धोतर फेडणाऱ्या युवकाला महात्मा फुले युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने ५१ हजाराचे बक्षीस जाहीर करून निषेधाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे 

पोलिसांनी निषेध मोर्चाला परवानगी नाकारली 

भिडे यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात निषेध नोंदविले जात आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्था तसेच तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी सावध भूमिका घेत निषेध मोर्चाला परवानगी नाकारली होती तरीही नागरिकांनी मोर्चा काढल्याने प्रशासन नेमकी काय भूमिका घेतंय याकडे सरावाचे लक्ष लागून राहिले आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या