Anti Corruption: पोलिसाच्या नावे लाच मागणाऱ्या वकिलाला बेड्या!


कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यात पोलिसांचे सहकार्य मिळविण्यासाठी मागितले 30 हजार छत्रपती संभाजीनगर : गुन्ह्याचा तपास करणारा पोलीस अधिकारी आपल्याला परिचयाचा असून तपासात सहकार्य करण्याच्या नावाखाली अशीलाकडून 30 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वकिलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राहुल सांडू भगत असे अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. 

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अंबड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अंबड पोलीस ठाण्यामध्ये कौटुंबिक छळाचा एक गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी ॲड. भगत यांचे अशिल यांना पोलिसांचे सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन भगत यांनी दिले. तक्रारदार असलेल्या तुमच्या पत्नीचा जबाब ना नोंदवता तपासात तुम्हाला सहकार्य केले जाईल. तपास अधिकारी माझ्या परिचयाच्या आहेत. असे सांगून त्यांनी अशिलाकडे तीस हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची शहानिशा व पडताळणी केल्यानंतर ॲड. भगत यांनी 30 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचखोर वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. meslot123 ความสนุกสนานร่าเริงของเว็บแห่งนี้ทำให้ผู้เล่นสามารถเล่นเกมสล็อตออนไลน์ได้ตลอด 1 วัน ไม่จำเป็นที่ต้องเดินทางไกลไปยังคาสิโน pg slot แบบเริ่มแรกอีกต่อไป กับเราพีจีเกม

    उत्तर द्याहटवा
  2. pgslot เว็บตรง ฝากง่าย คุณพร้อมที่จะเริ่มการผจญภัยในเกมที่น่าตื่นเต้นแล้วหรือยัง? ไม่ต้องมองหาที่ไหนอีกแล้ว PGSLOT เว็บฝากง่าย ที่ความสะดวกสบายมาบรรจบกับความตื่นเต้น

    उत्तर द्याहटवा