प्रतिनिधी - प्रवीण दरंदले
चितळी- राहता तालुक्यातील चितळी - जळगाव सीमेवर असलेला २ किलोमीटर शिवरस्ता गेली १५ वर्षांपासून अतिक्रमनात होता . त्यामुळे हा रस्ता सर्व सामन्य नागरिकांना वाहतुक करण्यासाठी बंद होता. पूर्वीच्या काळात पायवाट म्हणुन या रस्त्याचा वापर होत होता परंतु काही कारणास्तव या रस्त्यावरून येण्या-जाण्या साठी येथील नागरिकांना अडीअडचणीला सामोरे जावे लागत होते. यावेळी नागरिकांनी या प्रश्नावर तहसीलदार राहाता यांच्या नावे २०२२ या वर्षांत लेखी अर्ज सादर करून सदर शिव रस्ता शेतकर्यांना वाहतुक करण्यासाठी त्वरित खुला करून द्यावा अशी मागणी या अर्जात केली होती परंतु राहाता तहसील कार्यालयातून ह्या रस्त्याचा वाद मिटविण्यासाठी कुठलाही पाठपुरावा केला नाही शेवटी जळगाव पंचक्रोशीतील ज्येष्ठांनी हा रस्त्याचा वाद मिटून नवीनच आदर्श निर्माण केला आह़े.
यावेळी या शिव रस्त्याचे उद्घाटन जळगाव पंचक्रोशीतील जेष्ठ नेते गंगाधर भिवाजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीगणेशचे संचालक संपतराव नाथाजी चौधरी यांच्या पुढाकाराने चितळी डिस्टिलरी पदाधिकाऱ्यांन सोबत हा रस्ता खुला करणे बाबत चर्चा करून कुठलेही वाद न करता संबंधित अधिकारी व शेतकर्यांची रस्त्याची अडचण सोडविण्यासाठी मध्यस्थीने रस्त्याचा वाद मिटविण्यासाठी समंजस पनाने चर्चा केली, या चर्चेला यश आले तब्बल १५ वर्षापासुन त्रासदायक मानल्या जाणार्या रस्त्याचे वाद आता कायमचे मिटले असुन (दि.१. ऑगस्ट) रोजी गावातील ज्येष्ठांच्या हस्ते फित कापून हा शिवरस्ता या भागात रहाणार्या सर्व सामान्य शेतकर्यांसाठी आज खुला करण्यात आला असून या नंतर या रस्त्या संबंधित जाण्या- येण्या साठी रस्त्याचा वापर करता येईल येथील शेतकर्यांची रस्त्यालगतच्या स्थानिक रहिवाश्यांची कुठलीही अडवणूक होणार नसल्याची ग्वाही डिस्टिलरी विभागाचे अधिकारी धोत्रे यांनी दिली आहे.
यावेळी जळगावचे तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश चौधरी, महेंद्रशेठ चौधरी,माजी ग्रामपंचायत सदस्य,विजय एकनाथ चौधरी,बापूसाहेब चौधरी,तुषार चौधरी, तसेच येथील शेतकरी रामचंद्र मंडलिक,बाळू शिनगारे,रामभाऊ साबदे,तुकाराम साळुंके,अशोक मुळे,संदीप राहिंज,बाळासाहेब साळुंके, शरद वलसे,नीलेश साळुंके,कृष्णा सायबोळ,संतोष मुळे, तसेच आदी पंचक्रोशीतील शेतकरी या प्रसंगी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
0 टिप्पण्या