रमेश पवार खून खटला
निपाणी वडगाव येथील रमेश पवार खून खटल्यामध्ये आरोपी असलेल्या अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सोपान राऊत याचा जामीन फेटाळण्यात आला. औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. एम .जोशी यांनी हा निकाल दिला.
प्रसिद्ध वकील अँड.आर. एन. धोर्डे यांनी सोपानराव यांच्या वतीने युक्तिवाद केला होता. राऊत यांचे नाव संशयित म्हणून घेतलेले असून, त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नाही. तसेच साक्षीदारांच्या जवाबात तफावत आढळून येते असे युक्तिवादात म्हटले.
दरम्यान मृत पवार यांच्या नातेवाईकांच्यावतीने अँड. मनोज दोंड यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की, घटना घडलेली असताना आरोपीने सुमारे दीडशे कॉल केलेले आहेत. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये तसा उल्लेख आहे. या युक्तिवादांतर राऊत याचा जमीन फेटाळण्यात आला.
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मद्यपी पती रमेश पवार यांचा गळा दाबून पत्नीनेच खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. तालुक्यातील निपाणी वडगाव येथे 4 एप्रिल 2023 रोजी मध्यरात्री हा खून झाला. अंत्यविधीची घाई सुरू असताना गावातून पोलिसांना खबर मिळाल्याने हा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी सविता रमेश पवार (वय 40) हिला दोन महिन्यांनी जूनमध्ये अटक केली. त्यानंतर घटनाक्रम उलगडला.
या प्रकरणात एकूण चार आरोपी असून सविता पवार व अजय गायकवाड हे दोघे अटकेत आहेत. राऊत व प्रसाद भवार हे दोघे फरार आहेत. राऊत व भवार यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आज औरंगाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली. राऊत यांच्यावतीने विधीज्ञ अँड.आर. एन. धोर्डे यांनी युक्तिवाद केला होता. पवार खून खटल्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज (10 ऑगस्ट) रोजी जमीन फेटाळला.
0 टिप्पण्या