आमदार राम शिंदे, रोहित पवार यांच्यात वाद पेटला


कर्जत - भारतीय जनता पक्षाचे आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यातील वाद रंगला आहे. श्रेयवादावरुन ही लढाई सुरु झाली आहे. एमआयडीसी आणि एसटी डेपोवरुन हा वाद सुरु आहे. आमदार रोहित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ही नौटंकी बंद केली पाहिजे, असा टोला राम शिंदे यांनी रोहित पवार यांना दिला. रोहित पवार यांनी दोन एकरमध्ये घर बांधले, यावरही चर्चा व्हावी, असे राम शिंदे यांनी म्हटले आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड एमआयडीसीवरून दोन आमदारांमध्ये वाकयुद्ध सुरु झाले आहे. राम एमआयडीसी संदर्भात रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना पत्र लिहिले. त्यानंतर राम शिंदे यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. रोहित पवार ज्या एमआयडीसीसाठी प्रयत्न करत आहेत, ती जागा नीरव मोदी याची आहे. त्या जमिनीचे हिडान पार्टनर कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे, असा टोला राम शिंदे यांनी लगावला आहे.

आमदार राम शिंदे म्हणाले की, 2019 मध्ये माझ्या घराबाबत खूप मोठा इश्यू केला होता. माझे घर 2000 स्क्वेअर फूटमध्ये बांधले होते. परंतु आता रोहित पवार यांनी दोन एकरमध्ये घर बांधले, त्यावर रोहित पवार यांनी उत्तर द्यावे, असे राम शिंदे यांनी म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या