निपाणी वडगाव येथील रमेश पवार खून प्रकरण ... 'अखेर सोपान राऊत अटक

श्रीरामपूर  प्रतिनिधी - 

निपाणीवडगाव येथील रमेश पवार याच्या खूनातील फरार आरोपी अशोक कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सोपान राऊत यांना काल मध्यरात्री १२ वा. पोलिसांनी अटक केली  आहे. आज श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी खराडे साहेब यांच्या समोर राऊत यांना हजर केले असता दि. १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी  आता पर्यंत तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. तर  एक आरोपी अजून हि फरार  आहे .

चार महिन्यांपूर्वी निपाणीवडगाव येथे रमेश पवार या इसमाचा मृत्यू झाला. हा मृत्यू झोपेत झाल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोलिसांना फोन करून अंत्यविधीच्यावेळी बोलाविण्यात आल्याने रमेश पवार याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि शवविच्छेदनाच्या अहवालातून रमेश पवार याचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता मयत पवार याची पत्नी संगिता हिच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने तिला पोलिसांनी  अटक केली.

श्रीरामपूर येथील सत्र न्यायालयाने सोपान राऊत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी सोपान राऊत यांनी अर्ज केला होता. त्याची सुनावणी  गुरूवार १० ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात न्यायाधिश आर. एम. जोशी यांच्यासमोर झाली. यावेळी प्रसिद्ध वकील अॅड. आर. एन. धोर्डे यांनी सोपान राऊत यांच्यावतीने युक्तिवाद केला होता. तर मृत पवार यांच्या नातेवाईकांच्या वतीने अँड. मनोज दौंड यांनी युक्तिवाद केला. असा युक्तिवाद उच्च न्यायालयात केल्यानंतर सोपान राऊत यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता.

काल सोपान राऊत श्रीरामपूर परिसरात आल्याची माहिती पोलिसांना कळाली. पोलिसांनी काल शुक्रवारी रात्री १२.१७ वा. सोपान राऊत याला अटक केली

असून आता पर्यंत  तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. तर  एक आरोपी अजून हि फरार  आहे . 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या