दरोडाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

श्रीरामपूर - प्रतिनिधी 

श्रीरामपूर वाकडी रोडवरील रेल्वे बोगद्याजवळ दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले आहे.


योगेश सिताराम पाटेकर , रा. वडाळा महादेव,ता.  श्रीरामपुर,  अक्षय हिराचंद त्रिभुवन  रा. वार्ड नं. 07, रा . श्रीरामपुर,  बबलु उर्फ दानिश शौकत शेख  रा. वार्ड नं. 01, श्रीरामपुर, सुरेंद्र अशोक पवार, रा. निमगांव, शिर्डी, ता. राहाता, साहिल महेश साळुंके  शुभम वसंत वैद्य , सागर संतोष केदारे ,रा. जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे अटक केलेल्या आरोपींचे नाव असून त्यांच्यावर चैन स्नॅचिंग, दरोडा असे  विविध गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये  दाखल आहे.  

श्रीरामपूर ते वाकडी रोडवरील रोडवरील रेल्वे बोगद्या जवळ, काही इसम दरोडा सारखा गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत अंधारात एकत्र जमलेले असल्याची   माहिती मिळताच .पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून  आरोपीना ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली असता  त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिली .यावेळी  पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून   10 ग्रॅम वजनाचे मिनीगंठण, 5 ग्रॅम वजनाची अर्धवट तुटलेली चैन, 1 एअरगन, 1 तलवार, 3 दांडके, 1 नायलॉन रस्सी, विविध प्रकारचे सहा  मोबाईल फोन, एक टीव्हीएस रायडर व तीन  मोटार सायकली  असा मुद्देमाल जप्त केला आहे .

 योगेश सिताराम पाटेकर हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द दरोडा, जबरी चोरी, विनयभंग व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण14 गुन्हे दाखल  आहेत तर  दानिश शौकत शेख याच्या  विरुध्द जबरी चोरीचे  तीन  गुन्हे दाखल आहेत. सागर संतोष केदारे  त्यांच्या  विरोधात  चोरी, दुखापत व इतर कलमान्वये तीन  गुन्हे दाखल असून साहिल महेश साळुंखे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द एक गुन्हा दाखल आहे . 

ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून . पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या