मनसे अध्यक्ष राज ठाकरेनी घेतली योगेश खैरे यांची सांत्वन पर भेट
कोंढवा खुर्द (प्रतिनिधी)


कात्रज येथील सुनंदा संभाजीराव खैरे (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कात्रज येथे जाऊन मनसेचे प्रवक्ते योगेश संभाजीराव खैरे व त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश संभाजीराव खैरे व युवा उद्योजक हेमंत संभाजीराव खैरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जवळचे विश्वासु सहकारी आहेत पुणे दौरा करत असताना आपल्या मनसे सहकारी योगेश खैरे यांच्या मतोश्रीचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाल्याची बातमी समजली तेव्हा कात्रज येथे घरी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खैरे कुटुंबाची भेट घेऊन सात्वन केले
त्यावेळी मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे,सरचिटणीसअनिल शिदोरे,मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर,कार्यक्षम नगरसेवक वसंत (तात्या) मोरे,बाबु वागस्कर, किशोर शिंदे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते
   योगेश खैरे यांनी सांगीतले कि चार पाच दिवसांपुरुर्वी माझी आई हे जग सोडुन गेली आणी आज माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन आमचे सांत्वन केेेले दुख खुप मोठे आहे पण आधार देणारी माणस जवळ आली की दुखाचा भार हलका होतो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या