एक रुपयात विमा योजनेला मिळाली इतके दिवस मुदतवाढ..!


 इतिहासात पहिल्यांदाच दीड कोटी शेतकऱ्यांनी भरला पिक विमाकृषिमंत्री मुंडे यांनी दिली योजनेला तीन दिवसांची मुदत वाढ मुंबई : शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा भरून घेण्याची योजना आणली. यानंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यातील सर्वाधिक दीड कोटी शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना पिक विमा भरता यावा यासाठी राज्य सरकारने त्यांचा प्रीमियम भरण्याची जबाबदारी घेतली आहे. तर, यापेक्षाही अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी पिक विमा भरण्यासाठी तीन दिवसाची मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत. 


मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मराठवाड्यातल्या काही भागात अद्याप देखील जोरदार पाऊस झालेला नाही. त्यातच छत्रपती संभाजीनगर बीड जालना या जिल्ह्यात अजूनही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची आशा आहे. तर, दुसरीकडे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे पावसाळा अभावी जर नुकसान झालं तर त्यांच्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. ज्या भागांमध्ये फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे पावसाअभावी नुकसान होईल, त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कृषी विभागाच्या वतीने त्यांना योग्य ती मदत देण्यात येणार असल्याचही धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

______


काँग्रेसचा विरोध नेमका कुणाला..?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यामध्ये लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानिक करण्यात आले. या पुरस्काराला काँग्रेसच्या वतीने मोठा विरोध देखील झाला. यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की. काँग्रेसचा विरोध हा नेमका लोकमान्य टिळक यांना आहे, की तो पुरस्कार नरेंद्र मोदी यांना दिला म्हणून मोदी यांचा विरोध काँग्रेसला करायचा आहे, याचे स्पष्टीकरण काँग्रेसने अगोदर द्यायला पाहिजे. कारण, काँग्रेसच्या जडणघडणमध्ये लोकमान्य टिळक यांचा मोठा वाटा असून अशा पुरस्कार सोहळ्याला विरोध करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला नसल्याच ते म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या