सेल्फी काढताना दत्तनगरच्या तरुणाचा रंधा फॉल येथे बुडून दुर्दैवी मृत्यू

 




टिळकनगर (वार्ताहर)-

पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा सेल्फी काढताना तोल गेल्याने रंधा फॉल येथे बुडून  दुर्दैवी मृत्यू झाला.
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील  येथील  सुमित बाबासाहेब वाघमारे वय (21) हा तरुण आपला चुलत भाऊ सुशांत राधाकिसन वाघमारे सह शिर्डीच्या अन्य मित्रांसह 
पर्यटनासाठी भंडारदरा धरणावर  गेला होता.  शनिवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान रंधा फॉल या ठिकाणी सेल्फी काढत असताना तोल जाऊन धरणात बुडून त्याचा मृत्यू झाला. तात्काळ या संदर्भात स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी शोध घेतला असता संध्याकाळी उशिरा सुमितचा मृतदेह सापडला.  घटना घडल्या नंतर लगेचच दत्तनगर येथील राधाकिसन वाघमारे व कामगार नेते बबन माघाडे , अशोक पवार सह अन्य कार्यकर्त्यांनी घटनास्थळी झेप घेतली  रात्री उशिरा ओळख पटवून संबंधित युवकाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. कल रविवारी दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
धम्मदिप प्रतिष्ठानचे अध्यक्ष राधाकिसन वाघमारे यांचे पुतणे व तक्षशिला बुद्ध विहारचे विश्वस्त बाबासाहेब वाघमारे यांचा सुमित मुलगा होता.
सुमित वाघमारे हा दत्तनगर परिसरातील अत्यंत हुशार तरुण होता तो एम आर आय  टेक्निशन होता, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तो जॉब करीत होता त्याचे पश्चात आई-वडील भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या