मनसुख हिरेन हत्या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर


व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणआणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणीअटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयानं बुधवारीजामीन मंजूर केला आहे. याआधी मुंबई हायकोर्टानं प्रदीप शर्मा यांना जामीन नाकारला  होता. त्यानंतर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयातधाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयानं माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. 

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा देत नियमित जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन त्यांना दिला गेला होता. त्यानंतर प्रदीप शर्मा पुन्हा सरेंडर झाले होते. अशातच आता याच कारणावरुन त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या