शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट .... एक पीडितेची सुटका , दोन आरोपींना अटक

शिर्डी : शिर्डी शहरातील पिंपळगाव रोड येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात एक पीडित मुलींची सुटका करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दौलत किसन लटके, अकुश संजय घोडके अशी अटक केलेल्या  आरोपींची  नावे आहेत. या धडक कारवाईमुळे शिर्डी शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

एस


पी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी डिवायएसपी संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार पोनि गुलाबराव पाटील, हेकाॅ इरफान शेख, पोना कुऱ्हे, शिंदे, जाधव , मपोना भांगरे , पोकाॅ गांगुर्डे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

दि.२ ऑगस्ट २०२३ ला डिवायएसपी संदीप मिटके यांना शिर्डी शहर परिसरात पिंपळवाडीरोड येथील बंगल्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे. याबाबत माहिती मिळाली. त्याप्रमाणे माहिती ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकला. या छाप्यात एक पिडीत मुलीची सुटका करण्यात आली. तर यावेळी छाप्यात दौलत किसन लटके , अकुश संजय घोडके या दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपीविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आहे .

या कारवाईमुळे  शिर्डीकरांनी डिवायएसपी संदीप मिटके यांचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या