नाशिक :
नांदगाव तालुक्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आमदार सुहास कांदे यांनी घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक.
धरणातील शिल्लक पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याच्या सूचना. सिंचनासाठीचा पाणी पुरवठा बंद करण्यात यावा. याबाबतच्या सूचना अधिकारी वर्गाला करण्यात आल्या. सिंचनासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्या तरी शेतकऱ्यांचे वीज पंप जप्त करु नये अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
नांदगाव शहराला पाच महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे मुख्याधिकारी धांडे यांनी सांगितले तथापि शहराला गडूळ पाणीपुरवठा होत असल्याने तसेच नांदगावला वॉटर फिल्टर केंद्र नसल्यामुळे व तिसऱ्या लाईनचे काम चालू असल्याने पाईप लाईन फुटून चिखल माती गेल्याने गढूळ पाणी पुरवठा झाल्याचे त्यांनी सांगितले.
जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे मजुरांना रोजगार हमी अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देणे शाळांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून आमदार कांदे यांनी स्वखर्चातून वॉटर फिल्टर प्लांट देण्याचे आश्वासन दिले याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर असून त्यांनी या प्लांटची संपूर्ण काळजी घ्यायची आहे. खरिपाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला असून त्या माध्यमातून भविष्यकाळात दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळवून देण्यात येईल सरकार आपले असल्यामुळे त्या कामी मुख्यमंत्र्यांकडे योग्य पुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येईल असे आश्वासन आमदार कांदे यांनी दिले. या बैठकीसाठी सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या