गुटखा व्यापाऱ्यांवर श्रीरामपुरात छापेमारी...

 


सांघवीच्या गोडाऊनवर चार लाख 16 हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रतिकात्मक छायाचित्र


श्रीरामपूर : शहरातील गुटखा व्यापारासाठी कूप्रसिद्ध असलेल्या संघवी यांच्या गोडाऊनवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. त्यात विविध कंपन्यांच्या गुटखा तंबाखूसह रोख रक्कम असा चार लाख सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिवसभरात नुराणी, पान मसालेवाले, मावा गुटखावाले अशा विविध ठिकाणी छापेमारी केली. मात्र बहुतेक ठिकाणी झाड टाकण्यापूर्वीच संबंधितांना माहिती मिळाल्याने त्यांनी मालाची विल्हेवाट लावली. त्यामुळे बहुतेक ठिकाणी पोलिसांना रिकाम्या हाती परतावे लागले. सांगवी याच्याकडे मात्र बराच मोठा मुद्देमाल सापडला. 

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एक लाख 43 हजारांचा विमल पान मसाला, 7700 रुपयांचे तंबाखू पुडे, एक लाख दोन हजारांचा हिरा पान मसाला, 62000 रुपयांचा राजनिवास पान मसाला, 26 हजार रुपयांची तंबाखू, दहा हजारांचा गोवा गुटखा, 24 हजारांचा रजनीगंधा, इतर विविध कंपन्यांचे गुटखा व तंबाखू पुडे तसेच 36 हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या