शरद पवारांच्या बीडमधील सभेनंतर अजितदादांच्या गटातील नेत्याचा माफीनामा
- अमरसिंह पंडित
राजकीय जाणकारांच्या मते ही पोस्ट वाचल्यानंतर अमरसिंह पंडित याच्या मनात शरद पवार का अजित पवार यापैकी कोणते नेतृत्त्व निवडायचे, याबाबत अद्यापही गोंधळ असल्याचे दिसत आहे. अमरसिंह पंडितांनी ही भावनिक पोस्ट केल्यानंतर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे. त्यात अजित पवार गटात अमरसिंह पंडित राहणार की नाही, याच्यावर प्रश्नचिन्ह उभा करत नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यामुळे २७ तारखेला होणाऱ्या अजित पवारांच्या सभेवेळी सभेत नेमकं काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शरद पवार म्हणाले, "जिल्ह्याच्या नेत्यांना काय झालंय माहिती नाही. एका नेत्याने सांगितलं कोणीतरी आमचा सहकारी पक्ष सोडून गेला. आम्ही चौकशी केली की काय झालं? आजपर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण असं कळलं की त्यांना अमरसिंह पंडितांनी काहीतरी सांगितलं. काय सांगितलं तर पवार साहेबांचं आता वय झालंय, त्यामुळं आपल्याला भविष्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. पण माझं त्यांना एवढचं सांगण आहे माझं वय झालंय असं तुम्ही म्हणता पण तुम्ही माझं काम बघितलं आहे. ज्यांच्यामुळं तुमचं भलं झालं त्यांची थोडी तरी जाणीव ठेवा, अशा शब्दांत शरद पवार यांनी त्यांना सुनावले होते.
0 टिप्पण्या