राष्ट्र सह्याद्री संदिप डोके
हडपसर पुणे(प्रतिनिधी)
रस्त्यावर पडणारे खड्डे हे काय आजचे नाही गेल्या अनेक वर्षापासुन रस्त्यावर खड्डे पडले आहेत मात्र जनता त्याच खड्यातुन ये जा करते त्यांना राग कधी यायचा उलट काम न करणार्यांना जनतेने निवडुन न देता मतपेटीतुन आपला राग व्यक्त करावा मनसेचे १६ ठिकाणी खड्यासंदर्भात आंदोलन सुरु असुन आता तरी सरकारचे डोळे उघडावेत अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली
हडपसर येथे काळेबोराटे- न्हावलेनगर परिसरात हडपसर विधानसभा मतदार संघाच्या मनसेच्या अध्यक्षा इंद्रायणीताई अजय न्हावले यांच्या शिवगड जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज ठाकरे यांच्या शुभहस्ते झाले त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले कि निवडणुकीसाठी व्यवस्थेवर पुरेशा दबाव नाही त्यामुळे आम्हाला वाटेन त्यावेळेस निवडणुका घेणार कायदा नावाची गोष्ट राहिली नाही. आवाज उठवायला कोणी तयार नाही मनसे प्रत्येक ठिकाणी आंदोलन करते मात्र जो काम करत नाही ज्याचा नागरीकांना त्रास आहे. अशाच लोकांना जनता निवडुन देते मतपेटीतुन जनतेने राग व्यक्त केला पाहिजे असे ही ते म्हणाले.
कार्यक्रमास मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर,प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र वागस्कर,नगरसेवक वसंत मोरे ,अमोल शिरस ,प्रतिक वाघे,मनसे युवा नेते अजय न्हावले,मनसे महिला अध्यक्षा इंद्रायणीताई न्हावले,अनिल परदेशी,अजय जाधव आदी सह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे याचा पगडी, बैलगाडी व पुष्पगुच्छ देऊन इंद्रायणी अजय न्हावले तसेच अजय न्हावले यांनी स्वागत केले.
या वेळी इंद्रायणी न्हावले यांनी सांगीतले की या भागामध्ये माझे असणारे काम पाहुन राज ठाकरे यांनी माझे कौतुक केले मी केलेल्या कामाचा अहवाल प्रत त्यांनी बरोबर नेली असुन असेच जनतेचे चांगले काम करत रहा निवडणुकिवेळी मी पुन्हा या ठिकाणी सभेला येईन असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिल्याचे त्यांनी सांगीतले
उपस्थितांचे आभार युवा नेते अजय न्हावले यांनी मानले.
दळभद्री लोकांना धडा शिकवणार : इंद्रायणी न्हावले
काळेबोराटे- न्हावलेनगर भागात मी व माझे पती अहोरात्र काम करत असल्याने काही विरोधकांना ते डोळ्यात खुपते त्याचा राग मनात धरुन त्यांनी कार्यक्रमाचे फ्लेक्स तोडुन टाकले परंतु मी त्यांना कामातुन उत्तर देणार असुन संबंधित फ्लेक्सचे नुकसान करणाऱ्या विरोधात हडपसर पोलिस स्टेशनला तक्रार करणार असल्याचे न्हावले यांनी सांगीतले.
0 टिप्पण्या