पुणे : श्रीरामपूर येथील प्रतिथयश विधीज्ञ ॲड. सुभाष जंगले यांची पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमीच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष राहुल संत यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमी या संस्थेचा औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात स्वातंत्र्यदिनी पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी डॉ. विष्णू महाराज पारनेरकर, संस्थेचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत पारनेरकर, रणजीत मोहिते, बाळ डिके, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठणकर, एमआयटी चे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. याच कार्यक्रमात सुभाष जंगले यांना पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमीच्या प्रदेश महासचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
ॲड. जंगले यांच्या निवडीबद्दल शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप, माजी नगरसेवक आणि लायन्स क्लब श्रीरामपूर सफायरचे अध्यक्ष शेखर दुबैय्या, श्रीरामपूर प्रेस क्लबचे विश्वस्त तथा दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले, अरुण पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य किशोर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, श्रीरामपूर तालुकाप्रमुख गव्हाणे, अशोक मगर, राजेंद्र सलालकर, ॲड. रावसाहेब मोहन, ॲड. विजयराव पटारे, ॲड. आर . डी. भोसले, ॲड. शामराव खर्डे, ॲड. संदीप चोरमल, ॲड. मधुकर भोसले, ॲड. बी.बी. शिंदे, ॲड. बकाल, पोलीस पाटील शिवाजी भोसले, सोमनाथ महाले, किरण गायधने, रमण मुथा, चंपालाल फोपळे, संजय छल्लारे, भगवान उपाध्ये, भगवान वलेशा, भाऊ डाकले संदीप चव्हाण, आशिष धनवटे, रितेश रोटे, राजेंद्र लांडगे, मुन्ना परदेशी, कैलास दुबैय्या, सुभाष चव्हाण, सुभाष पानसरे, भगवान बत्रा यांच्यासह विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या