नवीन व्यापारी संकुलास कर्मयोगी मुरलीधर खटोड यांचे नाव द्यावे

श्रीरामपूर- बेलापूर येथील उपबाजार आवारातील नवीन व्यापारी संकुलास कर्मयोगी मुरलीधर खटोड यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांच्याकडे केली आहे.

 याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेलापुरात भव्य व्यापारी संकुल उभारले आहे, या व्यापारी संकुलाला बेलापूर गावासाठी  आयुष्य समर्पित करणारे कर्मयोगी मुरलीधर खटोड यांचे नाव दिल्यास अधिक शोभून दिसेल, त्यामुळे आगामी मासिक सभेत याबाबत ठराव करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अशोक गवते अशोक पवार, भूषण चंगेडे, ज्ञानेश्वर कुलथे, सुनील शहाणे, किशोर बोरुडे, संजय गोत्राचे ,रत्नेश कटारिया, संजय गोपाळे, रामभाऊ पोळ, सचिन कडेकर, गणेश मगर, आनंद दायमा ,तुकाराम मेहत्रे, गणेश सोनवणे, ज्ञानेश्वर आहेर, भाऊसाहेब खोसे, सतीश शेलार, मिलिंद काळे ,शिवदास दायमा, प्रमोद बिहानी, संदीप पवार, हर्ष काळे, दिलीप थोरात, अमित लुक्कड, श्री अग्रवाल, दत्तात्रय करपे ,मंगेश मगर ,सागर जावरे, आदींची नावे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या