पंतप्रधानपदासाठी जनतेची कोणाला पसंती?

दिल्ली : देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. १८ व्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. पण, २०२४ साली जनतेची पंतप्रधानपदासाठी कोणाला पसंती आहे? याचा एक सर्व्हे समोर आला आहे.

‘एबीपी’ आणि ‘सी व्होटर्स’ने छत्तीसगढमध्ये सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत ११ लोकसभा आणि ९० विधानसभा क्षेत्रातील जनतेची मते जाणून घेण्यात आली आहेत. त्यामध्ये १८ वर्षांवरील ७६७९ जणांनी सर्व्हेत भाग घेतला होता. २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना जनतेनं सर्वाधिक पसंती दिली आहे. तर, दुसऱ्या क्रमाकांवर राहुल गांधींना जनतेनं पसंती दिली आहे.

सर्व्हेमध्ये ६२ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी पसंती दर्शवली आहे. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केवळ ३ टक्के लोकांनीच पसंती दिली आहे. मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी आहेत. त्यांना २० टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी पसंती दाखवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या