गौण खनिज घोटाळा..? नऊ एकरावर अवैध मुरूम साठा

 पंचनामा करण्यासाठी संजय काळे करणार महसूल मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर सत्याग्रहकोपरगांव : येवला नगरपरिषदेच्या मालकीच्या येसगाव येथील साठवण तलावातील बेकायदेशीर मुरूम साठा जप्त करून गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची पोलीस व महसूल प्रशासन दखल घेत नसल्याने 19 ऑगस्ट रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानासमोर काळे झेंडे घेऊन आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दिला आहे. 

निवेदनात काळे यांनी म्हटले आहे की, येसगाव हे कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येते. सदर गावातील गोदावरी डावा कालवा शेजारील येवला नगरपरिषद मालकीच्या ९.८७ एकर जमीनीवर बेकायदेशीर मुरूम साठा केलेला आहे. 

          याबाबत 15 ऑगस्ट रोजी दोन तास ह्या मुरूमाचे गंजावर तिरंगा हातात घेऊन उभा राहण्याचा सत्याग्रह केला. परंतु आपले प्रशासनाने मुरूम जप्त करून पंचनामा केला नाही.

       बेकायदेशीर उत्खनन व साठा करणे कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे. मुख्याधिकारी येवला नगरपरिषद यांनी एवढा मोठा साठा करून शासनाची फसवणूक केली आहे. कोट्यावधीचा मुरूम खासगी संस्था व नागरीक यांना विकण्याचे कामकाज चालू आहे.

        मी सत्याग्रह करूनही दखल घेत नसल्यामुळे नाइलाजाने मला दुसरा सत्याग्रह करण्या शिवाय पर्याय नाही. मी १६ ऑगस्ट २०२३ रोजी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन समोर काळा झेंडा घेऊन बसलो होतो. तरीदेखील महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यात ९.८७ एकर जमीनी मध्ये गौण खनिजाचा बेकायदेशीर साठा व पोलीस व महसूल प्रशासन साधा साठा जप्त किंवा पंचनामा किंवा गुन्हा दाखल करीत नाही.         शांततापूर्ण आंदोलनाला जुमानत नसल्यामुळे नाइलाजाने १९ ऑगस्ट २०२३ रोजी शनीवारी सकाळी ११ वाजे पासून १२ वाजे पर्यंत हातात काळा झेंडा घेऊन महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लोणी येथील निवासाचे समोर सत्याग्रह करणार आहे, असा इशारा काळे यांनी आपल्या निवेदनात दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या