तलाठी परीक्षेत कॉपीबहादराला पकडले!

 


श्रीगोंदा : तलाठी परीक्षेतील पेपर फुटीची चर्चा सुरू असतानाच श्रीगोंदा येथे एका परीक्षार्थीला कॉपी करताना पकडले केंद्र निरीक्षकाच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य भालचंद्र बोराडे ( रा. नगर पुणे रोड, ताराबाई कॉलनी, केडगाव, ता. नगर, जि. अहमदनगर), असे कॉपी करणाऱ्या परीक्षार्थीचे नाव आहे. श्रीगोंदा केंद्र निरीक्षक तहसीलदार हेमंत ढोकले यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. सायंकाळी ४ ते ६ या दरम्यान तिस-या सत्रातील परीक्षादरम्यान तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान, सोनिया गांधी पॉलेटेकनीक श्रीगोंदा मांडवगण रोड, श्रीगोंदा येथे तलाठी परीक्षा चालु असताना, ६ वा. चे सुमारास कॉपीबहाद्दर आदित्य बोराडे यास पकडण्यात आले.


सध्या महसुल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन २३ करीता ऑनलाईन पद्धतीने दिनांक १७ आगष्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीमध्ये घेण्यात येणा-या परीक्षा करीता जिल्हा अधिकारी अहमदनगर यांच्याकडील आदेश क्र. मह/कार्या/आस्था-5 ड /677/2023 दिनांक 12/08/2023 अन्वये माझी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान, सोनिया गांधी पॉलेटेकनीक श्रीगोंदा मांडवगण रोड, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा येथे केंद्रं निरीक्षक म्हणुन तहसीलदार हेमंत ढोकले यांची नेमणुक करण्यात आली आहे.त्यानुसार आज दिनांक २२ आगष्ट रोजी सकाळी 08/30 ते सायं. 06/30 या वेळे मध्ये तिन शिष्ट मध्ये परीक्षा घेण्यात आली असल्याने केंद्रं निरीक्षक यांचे सोबत तहसील कार्यालय येथील शरद हनुमंत झावरे - अव्वल कारकुन श्री स्वप्नील सुद्रिक शिपाई, असे परीक्षा केंद्रांवर हजर होतो. सायंकाळी ४ ते ६ या दरम्यान तिस-या सत्रातील परीक्षादरम्यान तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान, सोनिया गांधी पॉलेटेकनीक श्रीगोंदा मांडवगण रोड, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा येथे तलाठी परीक्षा चालु असताना, ६ वा. चे सुमारास लँब क्र. 2 मधील पर्यवेक्षक नामे तुषार पोपट ढवळे यांनी आम्हाला रिपोर्ट दिला की, लँव क्र. 2 मधील कॉम्प्युटर नं. CO41 वरील परीक्षार्थी रोल क्र. 3223396500036 नामे आदित्य भालचंद्र बुराडे हा तलाठी भरती पेपर चालु असताना, सई प्रकाशन चे भारतीय संविधान कलमे आणि घटनादुरुस्ती चे पॉकेट सेरोज चे पुस्तक जवळ बाळगुन त्यामध्ये वघुन परीक्षेतील प्रश्न सोडवताना मिळुन आला आहे. अशी माहीती मिळाल्याने सर्वजण स्टाफसह सदर लॅब मध्ये जावुन सदर परीक्षार्थी रोल क्र.3223396500036 नामे आदित्य भालचंद्रं बुराडे याची झडती घेतली असता, त्याचे खिशात भारतीय संविधान कलमे आणि घटनादुरुस्ती चे पॉकेट सेरीज चे पुस्तक मिळुन आले आहे. सदरचे पुस्तक हे पर्यवेक्षक नामे तुषार पोपट ढवळे व कमांडिंग ऑफिसर महमंद फैसल रफदअली यांच्या समक्ष ताब्यात घेवुन त्यांनी ते जप्त केले आहे. जप्त केलेले पुस्तक परीक्षार्थी हॉल तिकीट, प्रो. फॉर्मा एच पर्यवेक्षक व कमांडिंग ऑफिसर यांनी आमच्या ताब्यात दिलेले असून ते मी समक्ष हजर करीत आहे. म्हणुन माझी आदित्य भालचंद्र बुराडे, रा. नगर पुणे रोड, ताराबाई "कॉलनी, केडगाव, ता. नगर, जि. अहमदनगर याचे विरुध्द शासन व इतर परीक्षार्थी यांची फसवणुक केलेली आहे त्यामुळे माझी त्याचे विरुध्द भा.द.वि. कलम 188, 417 सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ठ परीक्षामध्ये होणा-या गैरप्रकारास प्रति. करण्याबाबत अधि. सन 1982 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या