पाटात आढळला अज्ञात व्यक्तींचा मृतदेह

 अशोकनगर येथील पाटात आढळला अज्ञात व्यक्तींचा मृतदेह 





वडाळा महादेव [ वार्ताहर ] 


श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव अशोकनगर कारखाना समोरील परिसरातील पाटा मधील वाहत्या पाण्यात अज्ञात व्यक्तीचा  मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत अडकलेला असलेला नागरिकांनी पाहिला  यानंतर ग्रामस्थांनी येथील कामगार पोलीस पाटील सौ चंद्रकला यशवंत गायधने यांना घटनेची माहिती दिली यावरून श्री संजय बाजीराव  गायधने यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी  पाटामधील  मृतदेहा बाबत खबर  दिली यावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष परदेशी पो कॉ प्रविण कांबळे गृहरक्षक दलाचे राजेन्द्र देसाई पोलीस मित्र गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत सदरचा पाटाच्या पाण्यातील मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्याबाहेर घेऊन रुग्णवाहिकेमधुन श्रीरामपूर या ठिकाणी शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला  सदरचा मृतदेह हा अनोळखी  पुरुष जातीचा असून सदर व्यक्तीचे अंदाजे वय ५० ते ५५ दरम्यान असल्याचे दिसून आले सदर इसमाची उंची पाच फूट तसेच केस अर्धवट काळे पांढरे असुन  पोट फुगलेल्या अवस्थेत तसेच अंगामध्ये सँन्डो बनियन व्हिआपी अंडरवियर काळी पांढरी रेषा असलेला शर्ट तसेच राखाडी रंगाची पॅन्ट अंगामध्ये परीधान करून उजव्या हातामध्ये दोरा बांधलेला असलेले आढळुन आले 
यावेळी घटनास्थळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय  सोळुंखे साहेब पोलिस हवालदार रघुनाथ खेडकर यांनी भेट दिली तरी अज्ञात व्यक्ती विषयी माहिती अगर ओळख पटविण्यासाठी  श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशन येथे संपर्क साधावा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पो ना मच्छिंद्र शेलार करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या