(अहमदनगर प्रतिनिधी) शासकीय कामाचे टेंडर मिळविण्यासाठी कर्जत तालुक्यातील दोन ठेकेदारांनी अत्याधुनिक बँच मिक्स डांबर प्लॅन्ट आहे, याचे खोटे पुरावे आॅनलाईन टेंडरला जोडून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी दोघा ठेकेदारावर भिंगार पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी - 15 जुलै 2022 ते 29 जुलै 2022 या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कामांच्या निविदा प्रक्रियामध्ये आॅनलाईन टेंडर मागवले होते, निविदेत अत्याधुनिक बॅच मिक्स डांबर प्लॅन्टची अट होती, यामध्ये ठेकेदारांकडे उपलब्ध मशीनरी व निविदा प्रक्रियेतील अटी मध्ये अत्याधुनिक बॅच मिक्स डांबर प्लॅन्ट आहे अशी खोटी माहिती भरली होती. यावेळी या मशीनरीचे लोकेशन बाबतचे शपथपत्र ठेकेदारांनी सादर केले होते, जुलै 2022 मध्ये या कामांना सरकारने स्थगिती दिली होती. एप्रिल 2023 मध्ये या कामावरील स्थगिती राज्य सरकारने उठवली यानंतर या कामांच्या निविदा ओपन करण्यात आल्या, यानंतर हे टेंडर फायनल करण्यासाठी 1जुन 2023 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी सर्व ठेकेदारांची बैठक बोलावली होती या बैठकीत मे. टी. जी. तोरडमल अॅड कंपनी बहिरोबावाडी यांनी राहुल रामचंद्र शिंदे यांनी आॅनलाईन भरलेल्या ठेकेदाराच्या मशीनरीवर लेखी पत्र देऊन हरकत घेतली होती, यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निविदा भरलेल्या ठेकेदारांच्या मशिनरींची जागेवर जाऊन प्रत्यक्ष पहाणी केली. तसा अहवाल 5 जुलै 2023 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहमदनगर येथील कार्यालयात सादर करण्यात आला, या अहवाला प्रमाणे कर्जत तालुक्यातील राहुल रामचंद्र शिंदे मु. पो. बहिरोबावाडी. तसेच मे. दत्त दिगंबर कन्स्ट्रक्शन प्रो. दादासाहेब थोरात रा. थेरवडी पोस्ट बेनवडी या दोन्ही ठेकेदारांकडे अत्याधुनिक बॅच मिक्स डांबर प्लॅन्टची मशीनरी प्रत्यक्ष आढळून आली नाही यावरून संबंधित दोन ठेकेदारांनी कामाची निविदा भरताना सकृत दर्शनी शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून राहुल शिंदे व दादासाहेब थोरात या दोन्ही ठेकेदारावर सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगरचे उप कार्यकारी अभियंता श्रीराम बिहारे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे हे करत आहेत.
0 टिप्पण्या