केएल राहुल आणि श्रेयस अय्यरसह एका खेळाडूची सरप्राईज एन्ट्री
अपेक्षेप्रमाणे जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे, तर संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल. या संघात तिलक वर्माची सरप्राईज एन्ट्री झाली आहे. नवी दिल्लीत निवड समितीच्या बैठकीनंतर कर्णधार रोहित आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत १७ सदस्यीय संघाची घोषणा केली.
आशिया चषक २०२३ साठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप).
या खेळाडूंचे संघात पुनरागमन - जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दीर्घ काळानंतर टीम इंडियात परतले आहेत. तिघेही दुखापतीमुळे बराच काळ संघातून बाहेर होते. बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत पुनरागमन केले, तर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर थेट आशिया कपमध्ये खेळताना दिसतील. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या पुनरागमनावर सर्वांचे विशेष लक्ष होते.
1 टिप्पण्या
สล็อต PGSLOTแตกง่าย เล่นง่ายได้เงินจริงผู้ให้บริการเกมสล็อต pg slot ออนไลน์บนโทรศัพท์เคลื่อนที่ที่มีเกมนานาประการให้เลือก เป็นเกมรูปแบบใหม่ที่ทำเงินให้ผู้เล่นได้เงินจริง
उत्तर द्याहटवा